Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅसच्या नावाने आला फ्रॉड कॉल; अभिनेत्याने कॉलरला म्हणायला लावली मराठी कविता

Siddharth Chandekar: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला नुकताच महानगर गॅसकडून एक फ्रॉड कॉल आला होता. हा फ्रॉड कॉल त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Siddharth Chandekar
Siddharth ChandekarSaam Tv
Published On

Siddharth Chandekar: हल्ली फ्रॉड कॉलचे प्रकार फार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकरच्या बायको एमएससीबी कडून फ्रॉड कॉल आला होता. तर, आता मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला अलीकडेच महानगर गॅसच्या नावाने एक फ्रॉड फोन कॉल आला. मात्र सतर्क असलेल्या सिद्धार्थने या कॉलरचीच फिरकी घेत संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे डिजिटल फसवणुकीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सध्या डिजिटल युगात ऑनलाइन फ्रॉड, फेक कॉल आणि विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अनेक वेळा लोकांना सरकारी संस्था किंवा कंपन्यांच्या नावाने फोन करून वैयक्तिक माहिती किंवा पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारचा कॉल सिद्धार्थ चांदेकरला आला होता.

Siddharth Chandekar
Tina Ahuja: गोविंदा-सुनीता नात्याबद्दल मुलीने उघड केलं सत्य; म्हणाली, 'गेल्या दोन वर्षांत खूप बदल…'

सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महानगर गॅस कंपनीतून बोलत असल्याचे सांगत त्याच्याशी हिंदीत संवाद साधताना दिसते. मात्र सिद्धार्थला सुरुवातीपासूनच संशय आला. त्याने त्या व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावर समोरच्या व्यक्तीने मराठी येत नसल्याचे सांगितो.

Siddharth Chandekar
Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा वयाच्या ३१ व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

यावर सिद्धार्थने मजेशीर पद्धतीने त्या कॉलरचीच फिरकी घेतली. “तुम्ही मराठीत एक वाक्य बोला, तर मी तुम्हाला मेसेज करेन,” अशी अट त्याने घातली. त्यानंतर त्याने ‘स्वर्गात आकाशगंगा…’ या गाण्याच्या ओळी म्हणायला सांगितल्या. कॉलवरील व्यक्तीला मराठी नीट येत नसतानाही त्याने त्या ओळी तोडक्या-मोडक्या मराठीत म्हणण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सिद्धार्थने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सिद्धार्थच्या हुशारीचे कौतुक केले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करताना सिद्धार्थने नागरिकांना सावध राहण्याचाही सल्ला दिला. कोणतीही सरकारी संस्था किंवा कंपनी व्हॉट्सअॅपवर चॅट करण्यासाठी सांगत नाही, त्यामुळे अशा कॉल्सपासून सावध राहा, असे आवाहन त्याने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com