Viral Video: भर रस्त्यात रेड्याचा उच्छाद; स्कूटीस्वाराला हवेत उचलून आपटलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मोकाट रेडा भर रस्त्यात लोकांवर हल्ला करताना आणि दुकानात घुसून गोंधळ घालताना दिसतोय.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक रेड्याने भर रस्त्यात उच्छाद मांडलेला दितोय. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून त्यात रेडा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला करताना आणि दुकानात घुसून गोंधळ घालताना दिसतोय. या प्रकारामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रेडा रस्त्याच्या मध्यभागी उभा असल्याचं दिसतंय. तो पूर्णपणे मोकाट फिरत असून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर अचानक हल्ला करताना दिसतो. काही क्षणांतच परिस्थिती अधिक गंभीर होते. एका स्कूटीवरून जाणाऱ्या व्यक्तीला भैंसा थेट उचलून खाली आपटतो. स्कूटीसह त्या व्यक्तीला जमिनीवर फेकल्यानंतर तो त्याला तुडवण्याचाही प्रयत्न करताना दिसतो.

या घटनेनंतर रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडतो. अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करताना दिसतात. रेडा सतत होत असल्याने लोक सुरक्षित अंतर राखून उभे राहतात.

दुकानात घुसूनही माजवला गोंधळ

व्हिडिओमध्ये पुढे रेडा जवळच्या एका दुकानात घुसताना दिसतो. दुकानात घुसल्यानंतरही तो तिथे वस्तूंची नासधूस करतो. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुकानातील लोक घाबरून बाहेर पळताना दिसतात. काही वेळाने रेडा पुन्हा रस्त्यावर येऊन लोकांच्या मागे धावताना दिसतो.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळालेत. अनेकांनी या घटनेवर विनोदी कमेंट्स दिल्या असल्या तरी काही जणांनी शहरांमध्ये मोकाट जनावरांचा वाढता त्रास गंभीर असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com