Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

ताक

उन्हाळ्यात शरीराला थंडावा वाटण्यासाठी ताकचे सेवन केले जाते. दुपारी जेवल्यानंतर ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

ताक रेसिपी

दही, मसाला, मीठ आणि पाणी याचे मिश्रण एकत्र करून ताक बनवले जाते.

Taak Masala Recipe

मसाला रेसिपी

ताक बनवण्यासाठी ताकचा मसाला अत्यंत महत्वाचा आहे. अनेकांना घरच्या घरी ताकचा मसाला बनवता येत नाही.

Taak Masala Recipe

साहित्य

ताक मसाला बनवण्यासाठी जिरे, काळी मिरी, धणे, ओवा, काळे मीठ, पुदिना पाने, हिंग, सुंठ हे साहित्य एकत्र घ्या.

spices

मसाले भाजून घ्या

सर्वातआधी गॅसवर लोखंडी कढईमध्ये जिरे, जिरे, धणे, काळी मिरी आणि ओवा मंद आचेवर भाजून घ्या. मसाला जास्त जळणार नाही याची काळजी घ्या.

spices

सुकवलेली पुदीना पाने मिक्स करा

भाजलेले मसाले एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर यात सुकवलेला पुदीना पाने कुरकुरीत करून मिक्स करा.

pudina leaves | canva

मसाला एकत्र करा

 मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मसाले, पुदिना पाने, सैंधव मीठ, साधे मीठ, हिंग आणि सुंठ पावडर एकत्र करा.

Taak Masala Recipe

मसाला बरणीत ठेवा

हा संपूर्ण मसाला काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे हा मसाला २ ते ३ महिने टिकेल

Taak Masala Recipe

next: Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

येथे क्लिक करा...