Manasvi Choudhary
सध्या उष्णतेचा तडाका सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रिन लावणे महत्वाचे आहे. परंतू सनस्क्रिन लावताना देखील योग्य प्रमाणात लावणे गरजेचे आहे.
अनेकजण सनस्क्रिन लावताना काही चुका करताता यामुळे त्वचा आणखी काळी पडते त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
सनस्क्रिन लावतानाखूप जास्त किंवा खूप कमी न लावता ती योग्य प्रमाणात लावावी. टू फिंगर रूल प्रमाणे दोन बोटांवर सनस्क्रिनची रेष काढून तेवढी लावावी.
बाहेर पडण्यापूर्वी १० मिनिटे आधी चेहऱ्यावर सनस्क्रिन लावावी म्हणजे ती योग्य रित्या काम करते. अन्यथा लगेच लावून तुम्ही बाहेर पडलात तर ती काम करत नाही.
सनस्क्रिन केवळ चेहऱ्यावर नाही तर मान, कान, हात येथे देखील लावावी.
सनस्क्रीनचा प्रभाव साधारणपणे २-३ तासांनंतर कमी होतो. जर तुम्ही सतत उन्हात असाल, तर दर ३ तासांनी ते पुन्हा लावणे गरजेचे आहे.