Manasvi Choudhary
गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला सण आहे. गुढीपाडव्यानिमित्त महिला मराठमोळा साजश्रृंगार करतात.
गुढीपाडव्या निमित्त तुम्हालाही मराठमोळा लूक करायचा असल्यास तुम्ही कोल्हापूरी साज आणि ठुशी स्टाईल मंगळसूत्र घालू शकता.
कोल्हापुरी साज मंगळसूत्र तुम्ही पारंपारिक लूकसाठी पैठणी किंवा नऊवारी साडीवर घालू शकता.
ठुशी म्हणजे सोन्याच्या लहान मण्यांची मंगळसूत्र डिझाईन असते. ही तुम्ही चोकर स्टाईल मंगळसूत्र म्हणून निवडू शकता.
तुमची साडी जर डायमंड वर्क केलेली असेल तर तुम्ही माणिक किंवा हिरवे कुंदन जडवलेले मंगळसूत्र घालू शकता.
ठुशी दिसायला जड दिसते, पण ती वजनाला हलकी आणि घालण्यास सोयीस्कर असते. म्हणून तुम्ही खास साडीलूकवर ठुशी घालू शकता.
गुढीपाडव्याला खास मराठमोळ्या लूकवर तुम्ही हा साजश्रृंगार करू शकता यामध्ये तुमचा लूक उठून दिसेल.