Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Thackeray Family Unity on Display: वरळीच्या भव्य सभेत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे मंचावर हातात हात घालून आले आणि गळाभेट घेतली. यामुळे संपूर्ण सभागृहात जल्लोष झाला आणि शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ठाकरे बंधु हे आज एकत्र आले. या सभेला मोठा जनसागर उसळला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी सभेतून भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. सुप्रिया सुळे या देखील मंचावर उपस्थित होत्या.

भाषण संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना मंचावर बोलवण्यात आले. यावेळी सर्वांसोबत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बोलवले असता सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंच्या बाजूला उभे केले. याच दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी हातात हात धरून मंचावर आले आणि गळाभेट केली. यानंतर संपूर्ण वरळी डोममध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com