Vaibhav Suryavanshi

वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये बिहार, तर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. जानेवारी २०२५ मध्ये त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय लिस्ट ए आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभवचा जन्म २७ मार्च २०११ मध्ये बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर येथे झाला. ४ वर्षांचा असताना त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नऊ वर्षांचा असताना तो समस्तीपूरच्या क्रिकेट अकादमीत सामील झाला. डिसेंबर २०२४ मध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू बनला. त्यानंतर वैभवने सप्टेंबर २०२४ मध्ये त्याने भारताच्या अंडर-१९ संघात पदार्पण केले. वैभवला राजस्थान रॉयल्सने आयपीएल ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लावत त्यांच्या ताफ्यात सामील केले. १९ एप्रिल रोजी त्याने राजस्थानकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हा त्याचे वय १४ वर्षे २३ दिवस इतके होते. तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. २८ एप्रिल रोजी गुजरात विरुद्धच्या सामन्यात वैभवने ३५ चेंडूत १०० धावा करत अनेक विक्रम रचले.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com