

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या अंडर १९ वनडे सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील तिसऱ्या सामन्यात भारतीय टीमचा कर्णधार वैभव सूर्यवंशीने शानदार शतक झळकावलं. मागील सामन्यात १४ वर्षीय या फलंदाजाने २४ चेंडूत ६८ रन्सची धमाकेदार खेळी केली होती. तर आजच्या सामन्यात त्याने शतक ठोकत भारताला मजबूत स्थितीपर्यंत पोहोचवलं आहे. गेल्या १० डावांमधील हे त्याचं तिसरं शतक आहे.
वैभवने ७४ चेंडूत १२७ रन्सची खेळी केली. २०२५ हे वर्ष वैभव सूर्यवंशीसाठी खूप चांगलं गेलं होतं. तर आता त्याने २०२६ मध्ये पहिलं शतक ठोकलंय. सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या १० डावांमधील हे त्याचं तिसरं शतक आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याने १९० रन्स केले होते. त्यापूर्वी वैभवने अंडर १९ मध्ये आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईविरुद्ध १७१ रन्स केले. त्याच्या गेल्या १० डावांमध्ये वैभवने ६८८ रन्स केल्याची नोंद आहे. ज्यामध्ये तीन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहेत.
वैभवने या खेळीत नऊ चौकार आणि दहा सिक्स ठोकलेत. वैभवसोबत टीमचा उपकर्णधार आरोन जॉर्जनेही उत्तम खेळी केली. डावाची सुरुवात करताना दोघांनी २५.४ ओव्हर्समध्ये २२७ रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली. भारताने यापूर्वी तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिले दोन सामने जिंकून अजिंक्य आघाडी घेतली होती. आता टीम इंडिया क्लीन स्वीपवर लक्ष केंद्रित करतेय.
या सामन्यासाठी टीम इंडियाने त्यांच्या त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये दोन बदल केलेत. या सामन्यासाठी दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांना बाहेर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या जागी उद्धव मोहन आणि हेनिल पटेल यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलंय. राहुल कुमार आणि युवराज गोहिल यांना संपूर्ण सिरीजमध्ये एकही सामन्यासाठी प्लेईंग ११ मध्ये संधी देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.