

येत्या ११ तारखेपासून भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. या सिरीजमध्ये शुभमन गिलचं कमबॅक होणार आहे. दुखापतीमुळे तो काही काळ टीमपासून दूर होता. न्यूझीलंड सिरीजपूर्वी शुभमन गिल विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. मात्र यावेळी त्याची बॅट तळपली नाही.
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर एक मोठी चिंतेची बाब समोर आलीये. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शुभमन गिल स्वस्तात माघारी परतला आहे. यानंतर त्याला न्यूझीलंडविरूद्धची वनडे सिरीज खेळायची आहे. त्यामुळे त्याचं फॉर्ममध्ये नसणं टीमसाठी एक मोठा चिंतेचा विषय आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबच्या टीमकडून शुभमन गिल मैदानात उतरला होता. पंजाब विरूद्ध गोवा असा सामना खेळवला गेला. या सामन्याच्या सुरुवातीला गोव्याने २११ रन्सचा डोंगर उभारला होता. त्यानंतर जेव्हा पंजाबची फलंदाजी आली तेव्हा सर्वांच्या नजरा गिलच्या खेळीकडे होत्या. ओपनिंगसाठी मैदानात उतरलेल्या गिलने मात्र चाहत्यांची निराशा केली. गिलने या सामन्यात १२ बॉलमध्ये केवळ ११ रन्सी खेळी केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यामद्ये शुभमन गिल कर्णधार असून विजय हजारे ट्रॉफीचा आणखी एक सामना गिल खेळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे तो या खराब फॉर्मसह न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये उतरणार आहे.
यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळली गेली. या सिरीजमध्येही शुभमन गिल फ्लॉप गेला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 15 रन्स केलेले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 46 रन्सची खेळी केली होती. तिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 29 रन्स केले. यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सिरीज झाली तेव्हा तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
शुभमन गिलने गेल्या 10 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजमध्ये त्याची कामगिरी कशी आहे हे पाहावं लागणार आहे. या सिरीजनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची सिरीज होणार आहे. तर टी-20 वर्ल्डकप फेब्रुवारीमध्ये होणार असून त्यामध्ये गिलची निवड झालेली नाही. म्हणजेच या तीन सामन्यांमध्ये गिलला स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.