Breast cancer screening: ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी फक्त मॅमोग्राफी पुरेशी नाही? डॉक्टरांनी सांगितली दुसरी पद्धत

Why mammography misses some tumors: ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान करण्यासाठी मॅमोग्राफी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी चाचणी आहे. ४० वर्षांवरील महिलांसाठी ही चाचणी दरवर्षी करणे आवश्यक मानले जाते.
Breast cancer screening
Breast cancer screeningSAAM TV
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. कॅन्सरचं निदान वेळेत झालं आणि पुढचे उपचार योग्य वेळी घेतल्यास रूग्णाचा जीवही वाचू शकतो. आजच्या काळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर वेगाने वाढतोय. या आजाराचं निदान करण्यासाठी सर्वसाधारणपणे मॅमोग्राफी केली जाते. या मॅमोग्राफीतून कॅन्सरचं निदान होण्यास मदत होते. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा तपास सर्व महिलांसाठी पुरेसा ठरत नाही.

मॅमोग्राफी का अपुरी ठरते?

जगभरातील महिलांमध्ये ब्रेस्ट तपासणीसाठी मॅमोग्राफी केली जाते. मात्र भारतीय महिलांमध्ये Breast Tissue हे अधिक दाट असतात. त्यामुळे मॅमोग्राफीदरम्यान कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा दिसून येत नाहीत. यामुळे चुकीचे निष्कर्ष निघण्याची शक्यता आहे.

मॅमोग्राफी ही पाश्चात्य देशांमध्ये अधिक प्रभावी ठरतू शकते. तज्ज्ञांनी याचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, या ठिकाणच्या महिलांमध्ये फॅटी टिश्यू जास्त असतात. भारतात मात्र ही समस्या ४५ वर्षांपासून सुरू होते. तर पाश्चात्य देशांमध्ये ती साधारण ५५ वर्षांनंतर दिसते.

Breast cancer screening
Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

अल्ट्रासाऊंड आणि सेल्फ-एक्झामिनेशन

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, भारतासारख्या देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे अल्ट्रासाऊंड... भारतीय महिलांसाठी हा पर्याय अधिक प्रभावी आहे. याशिवाय महिलांनी दर महिन्याला स्वतःच्या ब्रेस्टची तपासणी करणं अत्यावश्यक आहे. यामुळे सेल्फ एक्झामिनेशन करताना गाठ, निप्पलमध्ये बदल किंवा त्वचेतील बदल लवकर ओळखता येतात. जर हे बदल महिलांना दिसले तर त्यांनी वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Breast cancer screening
Kidney function slowing down: खराब होण्यापूर्वी किडनी करू लागते संथ गतीने काम; शरीरातील 'हे' बदल वेळीच ओळखा

भारतातील परिस्थिती अधिक गंभीर

भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सर सर्वाधिक सामान्य झाला आहे. इतकंच नाही तर तो पाश्चात्य देशांच्या तुलनेत तो अधिक वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळतंय. या आजाराचे निदान उशिरा झाल्यामुळे किंवा निदानच न झाल्यामुळे ४० ते ५० टक्के महिलांचा मृत्यू होतो.

Breast cancer screening
Kidney damage: डोळ्यांमध्ये दिसणारे हे ५ बदल वेळीच ओळखा; किडनी खराब होण्याची असतात लक्षणं

रूग्णालयाच्या संशोधनातून काय समोर आलं?

टाटा मेमोरियल हॉस्पिटलने महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरबाबत एक संशोधन केलं होतं. या संशोधनातून असं समोर आलं की, क्लिनिकल तपासणीसोबत मॅमोग्राफी केली तरी योग्य निदान झालं नाही आणि मृत्यूदर कायम राहिला. तर संजय गांधी पीजीआयच्या अभ्यासानुसार, महिलांनी दर महिन्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं तर बदल लवकर ओळखता येतात. यामुळे वेळेत उपचार करणंही शक्य होतं.

Breast cancer screening
Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com