

फेब्रुवारीमध्ये आयसीसी वर्ल्डकप टी-२० ला सुरुवात होणार आहेत. बांगलादेशला २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपमधील सामने भारताबाहेर आयोजित करायचे आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांची टीम भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे काही सामने श्रीलंकेत होणार आहेत. आता जर बांगलादेशचे सामने भारतात झाले नाहीत तर बीसीसीआयचे काही नुकसान होईल का अशा प्रश्न उपस्थित होतोय.
मुळात २०२६ चा टी-२० वर्ल्डकप हा आयसीसीचा एक कार्यक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधून मिळणारी तिकिटं, स्पॉन्सरशिप आणि ब्रॉडकास्ट थेट बीसीसीआयकडे जात नाही. आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशन कार्यक्रमाच्या उत्पन्नाचा हिशोब ठेवतं. मुळात बीसीसीआय हे टी-२० वर्ल्डकप आयोजित करण्यापुरतं मर्यादित आहे.
२०२६ च्या टी-२० वर्ल्डकपमधून बीसीसीआयची कमाई मॅच डे सरप्लस आणि स्पॉन्सरशिपमधून होते. त्यामुळे जर बांगलादेशचे सामने भारतातून हलवले गेले तर त्याचा बीसीसीआयच्या कमाईवर फारसा परिणाम होणार नाही. जरी बीसीसीआयला तोटा झाला तरी ते सामन्यांच्या दिवसाच्या मॅच डे-इकॉनमिक्सपुरतं मर्यादित राहिल.
टी-२० वर्ल्डकपचं शेड्यूल जाहीर झाल्यापासून खेळाडू, कोच आणि इतर स्टाफ कर्मचारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या राहण्याचं आणि विमान बुकिंग आधीच झालंय. बांगलादेशचे सामने सध्या कोलकाता आणि मुंबईत खेळवण्यात येणार आहेत. जर बांगलादेशचे सामने हलवले गेले तर खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल बुकिंग आणि विमान प्रवासाचा खर्च आयसीसी करणार आहे.
अशामध्ये जर बांगलादेशाचे सामने भारताबाहेर शिफ्ट झाले तर त्यांच्यासोबत खेळणाऱ्या टीमच्या खेळाडूंनाही दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो. यामध्ये आयसीसीला काही प्रमाणात पैसे खर्च करावे लागू शकतात. यामध्ये बीसीसीआयला कोणताही खर्च करावा लागणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.