

नव्या वर्षाला सुरुवात झालीये. २०२६ हे नवं वर्ष भारतीय क्रिकेट टीमसाठी देखील महत्त्वाचं असणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेटसाठी हे महत्त्वाचं कारण टी-२० वर्ल्डकपचं आव्हान टीमसमोर आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. २०२४ साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा वर्ल्डकप जिंकला होता.
आतापर्यंत कोणत्याही टीमने सलग दोन वेळा टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातलेली नाही. ग्रुप स्टेजमध्ये भारताचे सामने संयुक्त राज्य अमेरिका (USA), नामीबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यासोबत होणार आहे.
सूर्यकुमार यादव एक युवा टीम घेईन या स्पर्धेत उतरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हे दोन्ही खेळाडू वनडे फॉर्मेटसाठी उपलब्ध असणार आहेत. 2027 वनडे वर्ल्ड कपच्या तयारीत या दोन्ही खेळाडूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
टीम इंडिया या वर्षी श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावरही जाणार आहे. जे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे दौरे कसे असणार आहे हे एकदा पाहूयात.
11 जानेवारी – पहिली वनडे, वडोदरा
14 जानेवारी – दुसरी वनडे, राजकोट
18 जानेवारी – तिसरी वनडे, इंदौर
21 जानेवारी – पहिली टी20, नागपूर
23 जानेवारी – दुसरी टी20, रायपूर
25 जानेवारी – तिसरी टी20, गुवाहाटी
28 जानेवारी – चौथी टी20, विशाखापट्टणम
31 जानेवारी – पाचवी टी20, तिरुवनंतपुरम
7 फेब्रुवारी ते 8 मार्च
यजमान: भारत आणि श्रीलंका
1 टेस्ट
3 वनडे
1 जुलै – पहिली टी20, चेस्टर-ले-स्ट्रीट
4 जुलै – दुसरी टी20, मॅन्चेस्टर
7 जुलै – तिसरी टी20, नॉटिंगहॅम
9 जुलै – चौथी टी20, ब्रिस्टल
11 जुलै – पाचवी टी20, साउथॅम्प्टन
14 जुलै – पहिली वनडे, बर्मिंगहॅम
16 जुलै – दुसरी वनडे, कार्डिफ
19 जुलै – तिसरी वनडे, लॉर्ड्स
2 टेस्ट
3 वनडे
3 टी20
3 टी20
3 वनडे
5 टी20
यजमान: जपान
2 टेस्ट
3 वनडे
5 टी20
3 वनडे
3 टी20
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.