Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

Rohit sharma vada pav reply: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा मजेशीर स्वभावामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अलीकडेच एका चाहत्याने त्याला विचारलं, "रोहित भाई, वडापाव खाणार का?" या प्रश्नावर रोहितने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
Rohit sharma vada pav reply
Rohit sharma vada pav replysaam tv
Published On

तब्बल ७ वर्षांनंतर रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफी खेळला. या सामन्यात त्याने तुफान फलंदाजी करत १५१ रन्सची खेळी केली. रोहित शर्माचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. मैदान असो किंवा मैदानाबाहेर रोहित शर्माचं मस्करीचा अंदाज हा सुरुच असतो. मुंबई विरूद्ध सिक्कीमच्या सामन्यात देखील रोहित शर्माचा हा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी एका चाहत्याने रोहितला एक प्रश्न विचारला आणि रोहितने अगदी खास पद्धतीने त्याचं उत्तर दिलंय.

रोहित शर्मा बुधवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सिक्कीम विरूद्धच्या सामन्यात सहभागी झाला होता. यावेळी तो मुंबईकडून मैदानात उतरला होता. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमध्ये रंगलेल्या या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Rohit sharma vada pav reply
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने रचला इतिहास; T20I क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला

सोशल मीडियावर झाला फोटो व्हायरल

रोहित शर्मा बाऊंड्री लाईनवर फिल्डींग करत होता. त्यावेळी सामना पाहायला आलेल्या चाहत्याने विचारलं की, रोहित भाई, वडापाव खाणार का? महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्माने त्याला प्रत्युत्तरही दिलं. रोहितने हात करत नाही असं म्हटलं. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून लोकांनी तो खूप शेअर केला आहे.

रोहित शर्माचं तुफान कमबॅक

३८ वर्षाच्या रोहितने सात वर्षानंतर विजय ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला होता. जवळपास १० हजार प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आले होते. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते धडपडत होतं.

Rohit sharma vada pav reply
Rohit Sharma: पूर्णपणे खचलो होतो, शरीरात ताकदही नव्हती...! क्रिकेटमधील निवृत्तीवर खुलेपणाने बोलला रोहित शर्मा

या सामन्यात रोहित शर्माने सिक्कीमच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने फक्त ६१ बॉल्समध्ये शतक झळकावलं. तर ९४ चेंडूंमध्ये १८ फोर आणि ६ षटकारांच्या मदतीने १५५ रन्सची खेळी केली. रोहितच्या या खेळाच्या जोरावर मुंबईने ८ विकेट्सने सिक्कीमचा धुव्वा उडवला.

Rohit sharma vada pav reply
Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

रोहितने यासोबतच माजी ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रोहित आणि वॉर्नर यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये संयुक्तपणे सर्वात जास्त १५० पेक्षा जास्त रन करणारे फलंदाज बनलेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये रोहित आणि वॉर्नरने ९-९ शककं केलीयेत.

Rohit sharma vada pav reply
Shubman Gill: शुभमन गिलच्या नावावर का बसली कात्री? रिपोर्टमधून सत्य कारण अखेर समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com