

प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनातून अजूनही २०२३ च्या वर्ल्डकपच्या आठवणी काही गेलेल्या नाहीत. केवळ चाहतेच नाहीत तर रोहित शर्मा देखील त्या वाईट आठवणींना अजून विसरलेला नाहीये. २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाच्या आठवणींबाबत रोहित शर्माने अजून एक मोठा खुलासा केला आहे. रोहितने सांगितलं की, त्या पराभवानंतर मी रिटायरमेंटचा विचार केला होता. कारण तेव्हा मी मानसिक आणि शारीरिक रूपाने पूर्णपणे खचलो होतो.
२०२३ च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने एक कर्णधार म्हणून भारताला खूप पुढे नेलं होतं. फायनलचा सामना सोडल्यास भारताने एकही सामना गमावला नव्हता. इतकंच नाही तर संपूर्ण टूर्नामेंटमध्ये रोहितने ११ सामन्यात ५९७ रन्स केले होते. परंतु वर्ल्डकप फायनलच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना रोहित शर्माला त्या पराभवानंतर इमोशनली स्वतःला कसं सांभाळलं, याविषयी प्रश्न करण्यात आला. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, व्यक्तीगत रूपाने तो पराभव माझ्यासाठी फार कठीण होता. कारण २०२२ मध्ये कर्णधार बनल्यानंतर वर्ल्डकप जिंकणं हे एकमेव लक्ष्य होतं. त्यावेळी प्रत्येकजण निराश होता आणि आम्हाला विश्वास बसत नव्हता की असं घडलंय.
रोहित म्हणाला, तो माझ्यासाठी फार कठीण काळ होता. मी केवळ २-३ महिने नाही तर २०२२ नंतर कर्णधारपद सांभाळल्यावर पूर्णपणे स्वतःला वर्ल्डकपसाठी झोकून दिलं होतं. टी-२० वर्ल्डकप असो किंवा २०२३ चा वर्ल्डकप असो...ट्रॉफी जिंकणं हे एकच माझं स्वप्न होतं. हरल्यानंतर मी पूर्णपणे खचलो होतो. माझ्या शरीरात ताकद नसल्याप्रमाणे मला वाटत होतं. स्वतःला सांभाळण्यासाठी आणि पुन्हा उभं राहण्यासाठी मला काही महिन्यांचा कालावधी लागला.
ज्यावेळी इतकं करूनही तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तेव्हा अशी प्रतिक्रिया मिळणं स्वाभाविक आहे. मात्र मला माहिती होतं की, इथेच आयुष्य संपत नाही. माझ्यासाठी हा एक मोठा धडा होता. त्यानंतर माझं लक्ष्य टी-२० वर्ल्डकप होतं, जो अमेरिका-वेस्टइंडिजमध्ये होता. मी माझं पूर्ण लक्ष्य तिथे केंद्रीत केलं. आजच्या घडीला हे म्हणणं फार सोप आहे पण त्यावेळी तो खूप कठीण काळ होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.