

लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षात टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध पहिली वनडे सिरीज खेळणार आहे. ही सिरीज 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र यापूर्वीच्या एका रिपोर्टमुळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
टीम इंडियाच्या 2025-26 सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट संदर्भात हा रिपोर्ट आहे. यंदाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नवीन वर्षाच्या सुरूवातीला 2025-26 साठी टीम इंडियाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. बोर्ड नेहमी फेब्रुवारी-मार्चमध्ये ही यादी जाहीर करतं. परंतु यावेळी लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
स्पोर्ट तकने त्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणलंय की, टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही खेळाडूंना ए + ग्रेडपेक्षा खालच्या ग्रेडमध्ये ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या ग्रेडमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. हे दोघंही सध्या ए प्लस ग्रेडमध्ये आहेत.
अशामध्ये तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या शुभमन गिलला काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. यावेळी त्याला प्रमोट केलं जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या त्याला ग्रेड ए मध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. परंतु टेस्ट आणि वनडे टीमचं कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याला थेट ग्रेड ए मधून टॉप ग्रेडमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. टॉप ग्रेडमधये सध्या रोहित, विराट, बुमराह आणि जडेजा यांचा समावेश आहे. A+ कॉन्ट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंना ₹7 कोटी मिळतात.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांना नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं जाऊ शकतं. शमी बऱ्याच काळापासून टीमबाहेर आहे. तर मुकेश कुमारही अनेक दिवसांपासून सिलेक्शनपासून दूर आहे.
यावेळी प्रमोशन मिळणाऱ्या खेळाडूंमध्ये तिलक वर्मा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा या खेळाडूंची नावं आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर टी-20 वर्ल्डकप 2027 साठी टीम इंडियामध्ये निवड झाल्यामुळे नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट इशान किशनचं नाव कायम राहण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.