

गेल्या २ दिवसांपासून बांगलादेश क्रिकेट बोर्डाची चर्चा सुरु आहे. २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० वर्ल्डकपसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांच्यात सुरू असलेल्या वादावर आयसीसीची भूमिका स्पष्ट असल्याचं दिसून येतंय. आयसीसीने भारतात बांगलादेशी खेळाडूंना कोणताही धोका नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे त्यांचे सामने भारताबाहेर हलवण्याची बांगलादेशची विनंती स्विकारलेली नाही.
क्रिकबझन दिलेल्या एका माहितीनुसार, मंगळवारी आयसीसी आणि बीसीबी अधिकाऱ्यांमध्ये एक ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत आयसीसीने स्पष्टपणे सांगितलं की, भारतात खेळताना बांगलादेशाच्या टीमला कोणताही विशिष्ट धोका आहे असं सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही ठोस गोष्टी नाहीत. त्यामुळे आयसीसीने वर्ल्डकपचं शेड्यूल किंवा ठिकाण बदलण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय. शिवाय बांगलादेशाची टीम भारतात खेळण्यास आली नाही तर त्यांच्या पॉईंट्समध्ये कपात होणार असल्याचं आयसीसीने सांगितलंय.
आयसीसीच्या या भूमिकेमुळे, बांगलादेशकडे फक्त दोनच पर्याय आहेत. यामध्ये एकतर संपूर्ण वर्ल्डकपवर बहिष्कार टाकावा किंवा आयसीसीच्या अटी मान्य कराव्यात आणि सामने खेळण्यासाठी भारतात यावं. जर बांगलादेशाच्या टीमने तसं केलं नाही, तर त्यांचा वर्ल्डकप हरल्यातच जमा आहे. बांगलादेशाची टीम खेळणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी गुण गमावेल आणि विरोधी टीमला वॉकओव्हर मिळेल. म्हणजे त्यांना सामना न खेळता दोन गुण मिळतील.
जर बांगलादेशने भारताचा दौरा केला नाही तर त्यांचे गुण कमी होऊ शकतात आणि त्यांना भारतातील त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये वॉकओव्हर देण्यात येईल. बांगलादेशाच्या टीमला ग्रुप स्डेजमध्ये चार सामने खेळायचे आहेत. बांगलादेशला त्यांचे सर्व ग्रुप स्टेजमधील सामने भारतात खेळावे लागणार आहेत. त्यांच्या चार सामन्यांपैकी तीन कोलकातामध्ये खेळले जातील, तर एक मुंबईत होणार आहे. त्यामुळे बांगलादेशाची टीम भारतात आली नाही तर त्यांना त्यांना आठ गुण गमावावे लागतील.
सध्याच्या शेड्यूलनुसार, बांगलादेशला त्यांचे गट सी मधील तीन सामने कोलकात्यात खेळायचे आहेत.
७ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता
९ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध इटली, कोलकाता
१४ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, कोलकाता
१७ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध नेपाळ, मुंबई
आयपीएल टीम केकेआरने अलिकडेच बीसीसीआयच्या विनंतीवरून बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला रिलीज केलं. बीसीसीआयने रहमानला रिलीज केलं तेव्हा बांगलादेश सरकारनेही या वादात उडी घेतली. ७ फेब्रुवारीपासून भारतात सुरू होणाऱ्या टी२० वर्ल्डकपवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली.
आयसीसीला लिहिलेल्या पत्रात, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने म्हटलंय की, ते त्यांचे सामने भारतात खेळणार नाहीत आणि हे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणीही केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.