

वैभव सूर्यवंशीची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी
फक्त २४ चेंडूंमध्ये ६८ धावा, स्ट्राइक रेट २८३
अंडर १९ वर्ल्ड कपमधील सर्वात चर्चेतील खेळींपैकी एक
वादळी खेळीसाठी ओळखला जाणारा वैभव सूर्यवंशीनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केलं होतं. त्यात त्याने अनेक चौकार आणि षटकार मारले होते. आता अंडर १९च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने तुफान फटकेबाजी केली.
त्याने फक्त १९ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. वैभवने फक्त २४ चेंडूत ६८ धावा ठोकल्या. त्याने प्रत्येक गोलंदाजाला चेपून काढलं, त्याने १० उत्तुंग षटकार मारत अनेकांना आर्श्चचकित केलं.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा १९ वर्षांखालील एकदिवसीय सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने १० विकेट गमावून २४५ धावा केल्या. जेसन रोलँड्सने शतक झळकावले आणि संघाला २५० च्या जवळ नेले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने फक्त ११ षटकांत १०३ धावा केल्या. पावसामुळे सामना सध्या थांबला आहे. वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने १० षटकांत १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत २४६ धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. या डावात वैभव सूर्यवंशीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यवंशीने फक्त १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. वैभवने त्याच्या डावात ५० धावा करण्यासाठी एकही चौकार मारला नाही. तर षटकाराचा पाऊस पाडला. त्याने फक्त २४ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याच्या डावात त्याने १० षटकार मारले. मात्र तो आपलं शतक पूर्ण करू शकला नाही.
नियमित कर्णधार आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत, वैभवने टीम इंडियाची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळली आणि स्फोटक खेळी करत विजयाचा पाया रचला. वैभवने त्याच्या चमकदार कामगिरीने दाखवलं की, कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे हे दाखवून दिलं.
वैभव सूर्यवंशी हा १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात १० षटकार मारणारा जगातील दुसरा कर्णधार, तर भारताचा पहिलाच कर्णधार आहे. याआधी असा विक्रम केवळ २००८ मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल हिलने केला होता. त्याने १९ वर्षांखालील सामन्यात नामिबियाविरुद्ध १२ षटकारांसह १२४ धावांची खेळी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.