Top Google Searches 2025: रोहित-कोहली नाही तर भारतीयांनी या खेळाडूला केलं गुगलवर सर्वाधिक सर्च; IPL मुळे होता चर्चेत

vaibhav suryavanshi most searched google: गुगलच्या ‘इयर इन सर्च २०२५’ अहवालानुसार भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सर्वाधिक शोधलेला खेळाडू रोहित शर्मा किंवा विराट कोहली नसून युवा क्रिकेटर वैभव सुर्यवंशी ठरला आहे
Top Google Searches 2025
Top Google Searches 2025saam tv
Published On

गूगल सर्च 2025 ची यादी जाहीर झाली झाली आहे. यामध्ये लोकांनी गुगलवर यंदाच्या वर्षात अधिक कोणत्या गोष्टी सर्च केल्या याची माहिती देण्यात आली. यावेळी खेळाडूंच्या बाबतीत कोणाला सर्वाधिक सर्च केलं गेलंय हे देखील समोर आलंय. भारतात वैभव सूर्यवंशी सर्वाधिक सर्च केला गेलेला खेळाडू ठरलाय. तर पाकिस्तानात भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा पाकिस्तानी खेळाडूंहून अधिक सर्च झाला आहे.

वैभव सूर्यवंशीने 2025 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी भारतात लोक त्याच्या वयाबद्दल आणि वैयक्तिक माहितीबद्दल गूगलवर शोध घेत होते. स्पर्धेतही त्याने उत्तम कामगिरी केली. अवघ्या 14 वर्षांच्या वयात त्याने भारतासाठी सर्वात वेगवान आयपीएल शतक ठोकलं. त्यानंतरचा अंडर-19 दौरा देखील चर्चेत राहिला. यावेळी त्याने अनेक विक्रम मोडले आणि नवे विक्रम केले देखील. याचा परिणाम गूगल सर्चमध्येही दिसून आला आणि ते भारतात सर्वाधिक सर्च झालेला खेळाडू ठरलाय.

Top Google Searches 2025
Gautam Gambhir: वनडे सिरीज जिंकल्यानंतर विराट-रोहितबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर? IPL टीमच्या मालकांनाही सुनावले खडे बोल

पाकिस्तानात अभिषेक शर्मा चर्चेत

2025 मध्ये भारत–पाकिस्तान यांच्यात एकूण 4 आंतरराष्ट्रीय सामने झाले. यामध्ये एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 3 सामने एशिया कपमध्ये खेळवण्यात आले. एशिया कपमध्ये अभिषेकने पाकिस्तानविरुद्ध 3 सामन्यांत 110 रन्स केले. तर सुपर-4 सामन्यात त्याने 74 रन्सची तुफान खेळी केली होती. त्या सामन्यात त्याचा पाकिस्तानी खेळाडूंशी वादही झाल्याचं समोर आलं होतं. कदाचित याच कारणामुळे पाकिस्तानात तो सर्वाधिक सर्च झालेला खेळाडू ठरलाय. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर हस्सन नवाज होते.

पाकिस्तानात सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू (2025)

  • अभिषेक शर्मा (भारतीय)

  • हस्सन नवाज

  • इरफान खान नियाजी

  • साहिबजादा फरहान

  • मुहम्मद अब्बास

भारतात वैभव सूर्यवंशी टॉपवर

अभिषेक पाकिस्तानात टॉपवर असला तरी भारतातील लोकांनी यंदाच्या वर्षी वैभव सूर्यवंशीला गुगलवर सर्वाधिक सर्च केलं आहे. तर अभिषेक शर्मा भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर प्रियांश आर्य आहे. पंजाब किंग्ससाठी खेळणाऱ्या प्रियांशने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांनी सीएसकेविरुद्ध 42 चेंडूत 103 रन्सची तुफानी खेळी केली होती.

Top Google Searches 2025
Gautam Gambhir: कोचला टार्गेट करू नका, त्याची नोकरीही...! गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

यादीत चौथ्या क्रमांकावर शाइक रशीद, तर पाचव्या क्रमांकावर भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रोड्रिग्ज होती. जेमिमाने आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 127 रन्सची विजयी खेळी केली आणि वर्ल्डकप जिंकवण्यात मोलाचा वाटा उचलला.

गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू (भारत – 2025)

  • वैभव सूर्यवंशी

  • प्रियांश आर्य

  • अभिषेक शर्मा

  • शाइक रशीद

  • जेमिमा रोड्रिग्ज

  • आयुष म्हात्रे

  • स्मृती मंधाना

  • करुण नायर

  • उर्विल पटेल

  • विग्नेश पुथुर

Top Google Searches 2025
Lucky zodiac signs: आजचा दिवस का आहे विशेष? पंचांग, ग्रहस्थिती आणि चार भाग्यवान राशी जाणून घ्या

ग्लोबल ट्रेंडिंग स्पोर्ट्स टीम्स

गूगलने टॉप ट्रेंडिंग ग्लोबल सर्चमध्ये स्पोर्ट्स टीम्सची यादीही जाहीर केली. यात पीएसजी अव्वल ठरली. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आयपीएलची टीम पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आहेत. या दोन्ही टीम्सने अजूनही आयपीएल किताब जिंकलेला नाही, पण यंदा पंजाबने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती.

Top Google Searches 2025
Chaturgrahi Yog: बुधाच्या गोचरमुळे तयार होणार चतुर्ग्रही योग; या राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा

टॉप स्पोर्ट्स इव्हेंट्स (2025)

  • फीफा क्लब वर्ल्ड कप

  • एशिया कप

  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी

  • महिला वनडे वर्ल्ड कप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com