Chaturgrahi Yog: बुधाच्या गोचरमुळे तयार होणार चतुर्ग्रही योग; या राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा

Chaturgrahi Yoga 2025: ज्योतिषांच्या मते, बुधाचा गोचर होत असून त्यातून चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. हा विशेष ग्रहयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
Chaturgrahi Yog 2025
Chaturgrahi Yog 2025Saam Tv
Published On

6 डिसेंबर एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार झाला आहे. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच तीन मोठे ग्रह उपस्थित आहेत. यामध्ये सूर्य, मंगळ आणि शुक्र यांचा समावेश आहे.

अशा परिस्थितीत बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य मिळून वृश्चिक राशीत चतुर्ग्रही योग तयार करत आहेत. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, हा दुर्मिळ संयोग तीन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

हा योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम मानला जातो. प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे. तुमची निर्णयक्षमता मजबूत होईल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळणार आहे. कमाईसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

Chaturgrahi Yog 2025
Mangal Gochar: 18 महिन्यांनी मंगळ करणार शुक्राच्या घरात प्रवेश; 'या' राशींचं नशीब चमकणार, आर्थिक प्रगती होणार

वृश्चिक रास

हा योग थेट तुमच्या राशीत तयार होत असल्यामुळे त्याचा प्रभाव सर्वाधिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर होईल. सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा अधिक मजबूत होणार आहे. लोक सल्ला किंवा मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे येणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांत सकारात्मक बदल होणार आहे.

Chaturgrahi Yog 2025
Sun-Mangal Yuti: 18 वर्षांनी तयार होणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

कुंभ रास

हा योग कुंभ राशीच्या लाभभावाला अधिक मजबूत करणारा आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांचे वेतन किंवा कमाई वाढू शकते. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाराशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील. भविष्यातील योजनांमध्येही समान गुंतवणूक करू शकता.

Chaturgrahi Yog 2025
Mangal Surya Yuti: 18 वर्षांनंतर एकमेकांच्या जवळ येणार सूर्य-मंगळ; या राशींची होणार चांदीच चांदी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com