Mayor Election

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर कोण, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आता महापौर निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. महापालिकेतील सत्तासमीकरण ठरवणारी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कोणत्या पक्षाकडे बहुमत आहे, कोणते पक्ष एकत्र येणार, अपक्षांची भूमिका काय असेल, यावर महापौरपदाचा निर्णय होणार आहे. अनेक ठिकाणी स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून रणनीती आखली जात असून, आघाडी–युतीचे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com