म्हणे वास्तूदोष... नैऋत्येला दार असलेलं ऑफिस शिंदेसेनेनं नाकारलं!, VIDEO

Office Politics At BMC: मुंबई महापालिकेत कार्यालय वाटपावरून वाद. नैऋत्य दिशेला दरवाजा असल्यामुळे वास्तूदोष असल्याचं कारण देत शिंदेसेनेनं कार्यालय नाकारलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे आज शिवसेना आणि भाजपने उमेदवार जाहीर केले. भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिंदेंच्यासेनेकडून संजय घाडी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक पक्षाला कार्यालय देखील देण्यात आले. मात्र या दरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक अजब गजब कारण देत कार्यालय नाकारले आहे. जे कार्यालय शिंदेसेनेला दिल्या गेले होते त्याची दिशा नैऋत्य आहे. पूर्वी हे कार्यालय काँग्रेस वापरत होती. त्यामुळे या कार्यालयाचा दरवाजा चुकीचा दिशेला असल्याने यामध्ये वास्तूदोष असून यामुळेच काँग्रेसची ही परिस्थिती आहे. काँग्रेसची स्थिती ही मुंबईत दिवसेंदिवस वाईट होत चालली असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे हे कार्यालय आम्हाला नको असे शिंदे गटाचे नेत्यांनी सांगितले.

मुंबई महानगर पालिकेत कशी असेल कार्यालयाची रचना

जुनं शिवसेनेचं कार्यालय विभागून 30 टक्के भाग कार्यालय क्र. 1 शिवसेना शिंदे, 70 टक्के भाग ठाकरेंची शिवसेना कार्यालय क्र. 2

कार्यालय क्र. 3 भारतीय जनता पार्टी (2017 देण्यात आलेलं कार्यालय पुन्हा भाजपलाच देण्यात येणार)

कार्यालय क्र. 4 मनसे

कार्यालय क्र. 05 AIMIM

कार्यालय क्र. 07 राष्ट्रीय काँग्रेस शिक्षण समिती कार्यालयाच्या उजव्या बाजूचं कार्यालय (जुनं काँग्रेस कार्यालय)

कार्यालय क्र. 08 राष्ट्रवादी (अजित पवार) राष्ट्रवादी (शरद पवार), समाजवादी पार्टी एकत्रित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com