Maharashtra Mayor List : तुमच्या शहराचा कारभारी कोण? मुंबई, ठाण्यापासून सोलापूर ते नागपूरपर्यंत २९ महापालिकांच्या महापौर-उपमहापौरांची संपूर्ण यादी

Complete list of mayors and deputy mayors in Maharashtra 2026 : आपल्या शहराचा कारभारी कोण? मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील २९ महापालिकांतील महापौर आणि उपमहापौरांची संपूर्ण यादी.
Maharashtra Mayor List 2026: City-Wise Mayors & Deputy Mayors of 29 Corporations
Complete list of mayors and deputy mayors in Maharashtra 2026Saam TV Marathi News
Published On

Mumbai Pune Nagpur mayor names latest update : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांचा कारभारी कोण होणार? सत्ता कोणत्या पक्षाची? हे चित्र आता स्पष्ट झालेय. महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी महायुतीचाच महापौर झालाय. तर मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या माहापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याचे चित्र आहे. भिवंडी आणि परभणी यांसारख्या महापालिकेत सर्वाधिक जागा असूनही बहुमताअभावी सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. चंद्रपूरमध्ये मात्र 'भाजप-ठाकरेसेना' असे वेगळे समीकरण तयार झालेय. (City-wise mayor election results Maharashtra)

राज्यातील महापालिकांमध्येही 'महायुती'चा दबदबा पाहायला मिळालाय. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या युतीने अनेक महत्त्वाच्या शहरांवर आपला झेंडा फडकवला आहे. काही ठिकाणी काँग्रेस, ठाकरे गट आणि स्थानिक आघाड्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. आपल्या शहराचा कारभार नेमका कोणाच्या हातात आहे आणि कोण आहेत नवे महापौर-उपमहापौर? वाचा हा सविस्तर अहवाल.

Maharashtra Mayor List 2026: City-Wise Mayors & Deputy Mayors of 29 Corporations
HSC Exam : काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग! घरात वडिलांचे पार्थिव, लेकीने काळजावर दगड ठेवून दिला बारावीचा पेपर

राज्यातील २९ महापालिकांतील महापौर-उपमहापौरांची यादी एका क्लिकवर....

मुंबई

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - रितू तावडे (भाजप)

उपमहापौर - संजय घाडी (शिंदेसेना)

ठाणे

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - शर्मिला पिंपळकर (शिंदेसेना

उपमहापौर - कृष्णा पाटील (भाजप)

कल्याण डोंबिवली

सत्ता कुणाची - महायुती -

महापौर - हर्षाली चौधरी (शिंदेसेना)

उपमहापौर - राहुल दामले (भाजप)

मीरा-भाईंदर

सत्ता कुणाची - भाजप

महापौर -डिंपल मेहता (भाजप)

उपमहापौर -ध्रुव किशोर पाटील (भाजप)

वसई विरार

सत्ता कुणाची - BVA

महापौर - अजीव पाटील (BVA)

उपमहापौर -मार्शल लोपिस (BVA)

नवी मुंबई

सत्ता कुणाची - भाजप

महापौर -सुजाता पाटील (भाजप)

उपमहापौर - दशरथ भगत (भाजप)

भिवंडी

काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. पण सत्तास्थापनेसाठी कुबड्यांची गरज लागेल.

उल्हासनगर

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - अश्विनी निकम (शिंदेसेना)

उपमहापौर -अमर लुंड (भाजप)

पनवेल

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - नितीन पाटील (भाजप)

उपमहापौर - प्रमिला पाटील (भाजप)

पुणे

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - मंजुषा नागपुरे (भाजप)

उपमहापौर -परशुराम वाडेक (भाजप)

पिंपरी चिंचवड

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - रवी लांडगे (भाजप)

उपमहापौर - शर्मिला बाबर (भाजप)

नागपूर

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - नीता ठाकरे (भाजप)

उपमहापौर -लीला हाथीबेड (भाजप)

नाशिक

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - हिमगौरी आडके (भाजप)

उपमहापौर -विलास शिंदे (शिंदे सेना)

छत्रपती संभाजीनगर

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - समीर राजूरकर (भाजप)

उपमहापौर - राजेंद्र जंजाळ (शिंदे सेना)

नांदेड

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - कविता मुळे (भाजप)

उपमहापौर -दीपकसिंह रावत (भाजप)

अमरावती

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - श्रीचंद तेजवानी (भाजप)

परभणी

परभणी महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाकडे सर्वाधिक जागा आहेत. पण बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करता आलेले नाही.

मालेगाव

सत्ता कुणाची -इस्लाम पार्टी - सपा

महापौर - नसरीन बानो खालिद (इस्लाम पार्टी)

उपमहापौर - शान-ए-हिंद (एसपी)

सोलापूर-

सत्ता कुणाची -भाजप

महापौर - विनायक कोंड्याल (भाजप)

धुळे

सत्ता कुणाची? - भाजप

महापौर - मायादेवी परदेशी (भाजप)

उपमहापौर - ज्योत्स्ना पाटील (भाजप).

सांगली

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - धीरज सूर्यवंशी (भाजप)

उपमहापौर - गजानन मगदूम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-यूपी)

कोल्हापूर

सत्ता कुणाची - महायुती

महापौरपद- रूपाराणी निकम (भाजप)

उपमहापौरपद - अक्षय जिरगा (जनसुराज्य)

इचलकरंजी

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - उदय धातुंडे (भाजप)

उपमहापौर - अनिल कुमार (भाजप)

जळगाव

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - दीपमाला काळे (भाजप)

उपमहापौर - मनोज चौधरी (शिंदे सेना)

अहिल्यानगर

सत्ता कुणाची - महायुती

महापौर - ज्योती गाडे (राष्ट्रवादी यूपी)

उपमहापौर - धनंजय जाधव (भाजप)

अकोला

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - शारदा खेडकर (भाजप)

उपमहापौर - अमोल गोगे (भाजप)

लातूर

सत्ता कुणाची - काँग्रेस

महापौर - जयश्री सोनकांबळे (काँग्रेस)

उपमहापौर - स्नेहल उटगे (काँग्रेस)

जालना

सत्ता कुणाची - भाजप

महापौर - वंदना मगरे (भाजप)

उपमहापौर - राजेश राऊत (भाजप).

चंद्रपूर

सत्ता कुणाची - भाजपा- ठाकरेसेना

महापौर - संगीता खांडेकर (भाजप)

उपमहापौर - प्रशांत दानव (शिवसेना ठाकरे).

Maharashtra Mayor List 2026: City-Wise Mayors & Deputy Mayors of 29 Corporations
Ajit Pawar Death : अजितदादांचा १०० टक्के घातपातच, गुजरात कनेक्शन सांगत रोहित पवारांचा पुराव्यासह दावा, ५ प्रश्नांने महाराष्ट्रात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com