Nashik Mayor: ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, विरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार

Nashik Mayor Election: नाशिक महानगर पालिकेत महापौर भाजपचा आणि उपमहापौर शिवसेना शिंदेगटाचा होणआर आहे. भाजपविरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार आहे. तर महापौरपदाच्या निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतली.
Nashik Mayor: ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, विरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार
Nashik MayorSaam Tv
Published On

Summary -

  • नाशिक महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेना युती सत्तेत आली

  • भाजपच्या हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौर होणार

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि मनसेने भाजपला पाठिंबा दिला

  • चार वर्षांनंतर नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलं. विरोधात लढलेली शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहे. नाशिकमध्ये भाजपचा महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर होणार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेवर भाजपची सत्ता राहणार आहे.

नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उपमहापौर बिनविरोध निवड होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतली. नाशिक महानगर पालिकेमध्ये भाजपसह शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि राज ठाकरेंची मनसे सत्तेत असणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Nashik Mayor: ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, विरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार
Nashik Tourism: 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करताय? नाशिकपासू ४५ किमीवर आहे हे सुंदर हिल स्टेशन

नाशिकला आज महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. भाजपच्या हिमगौरी आडके महापौर तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौर होणार आहेत. नाशिक महानगर पालिकेमध्ये भाजपचे नगरसेवक दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पारंपारिक पोशाख आणि फेटे घालून भाजपच्या महिला नगरसेविका महापालिकेत दाखल झाल्या आहेत.

Nashik Mayor: ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, विरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार
Nashik News: ४०० कोटींच्या कंटेनर लुटीचा ‘मास्टरमाइंड’ सापडला, नाशिक पोलिसांसमोर शरण; आणखी धागेदोरे हाती लागणार

दरम्यान, तब्बल चार वर्षानंतर नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट आज संपुष्टात येतेय. नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी पुढच्या काही वेळामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या सभागृहामध्ये जय्यततयारी करण्यात आली आहे. नवीन आसनं, रंगरंगोटी करून सभागृहाला नवा साज देण्यात आला आहे.

Nashik Mayor: ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, विरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार
Nashik Accident: नाशकात डांबर वाहणारा ट्रक उलटून एक अपघात, गरम डांबराखाली दबून कर्मचारी भाजला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com