मुंबईचा महापौर अन् उपमहापौर कोण होणार? महत्त्वाची अपडेट समोर

bmc mayor post : मुंबईचा महापौर अन् उपमहापौर कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. याबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे.

मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर आणि विषय समित्यांवरील अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई महापालिकेसाठी बैठक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या बैठकीत महापौर, उपमहापौर, विषय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. येत्या ७ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यास तारीख निश्चित होणार असल्याने मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार तेव्हाच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com