Amravati Municipal Corporation :
MIM corporator Mirabai Kamble expelled from the party after cross-voting in Amravati mayor and deputy mayor elections.

भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

Amravati Municipal Corporation: अमरावती महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये विचित्रच घडामोड पाहायला मिळाली. एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जात भाजपच्या महापौर उमेदवाराला आणि युवा सन्मान संघटनेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केलं.
Published on
Summary
  • अमरावती महापालिकेत क्रॉस वोटिंगचा मोठा वाद

  • एमआयएम नगरसेविका मिराबाई कांबळे यांची हकालपट्टी

  • भाजपच्या महापौर उमेदवाराला दिलं मतदान भोवलं

अमरावती महानगरपालिका मोठी घडामोड झालीय. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर उमेदवाराला आणी युवा सन्मान संघटनेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केलं. कांबळे यांच्या या कृतीची गंभीर दखल घेत एमआयएम पक्षाने त्यांना तडकाफडकी पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Amravati Municipal Corporation :
Maharashtra Politics: शिंदे गटात मोठी बंडखोरी; उपमहापौर पदासाठी नेत्यांनी डावलला पक्षाचा आदेश

एमआयएमच्या गटनेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिकृत 'व्हीप' (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. मात्र कांबळे यांनी विचारधारेच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई अटळ असल्याचे सांगत, गटनेत्यांनी त्यांच्या हकालपट्टीची अधिकृत घोषणा केली आहे. इतकेच नाही तर मीराबाई कांबळे यांचा नगरसेवक पद रद्द करा यासाठी एमआयएमच्या वतीने अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र देखील देण्यात आलंय.

Amravati Municipal Corporation :
भाजपच्या बड्या नेत्याला काठ्या, लोखंडी गजाने मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. त्यावेळी सदस्यांनी हात उंचावून मतदान केलं. श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने असलेल्या सदस्यांना हात उंचावण्यास सांगितलं. त्यावेळी भाजप, युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांनी हात वरती केले. पण अचानकपणे एमआयएमच्या बडनेरा जुनी वस्तीच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी हात वरती केला.

त्यांनी श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने मतदान केले. या निवडणुकीत तटस्थ असलेल्या एमआयएमच्या इतर ११ नगरसेवक आश्चर्याचकित झाले. एमआयएमच्या गट नेत्याने मीरा कांबळे यांना हात खाली करण्यास सांगितले, पण त्यांनी गटनेत्याचा आदेश मानण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com