Chanakya Niti
आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान विद्वान, कुशल अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. त्यांनी "चाणक्यनीती" नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये जीवन, राजकारण, कुटुंब, मैत्री, शिक्षण, अर्थव्यवस्था, आणि व्यवहारज्ञान याविषयी अमूल्य मार्गदर्शन आहे. त्यांनी मित्र आणि शत्रू ओळखण्याचे धडे, स्त्री आणि कुटुंबविषयक विचार, धन आणि व्यवसायाचे तत्त्वज्ञान, शिक्षणाचे महत्त्व अशा अनेक गोष्टींवर योग्य मार्गदर्शन केले आहे. सगळ्यांच्या जीवनातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी तुम्हाला चाणक्य निती खूप उपयोगी ठरेल अशी आशा आहे.