Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींवर मार्गदर्शन देणारे गुरु मानले जातात.
अनेकांना वाटतं की, पुरुष महिलांच्या सौंदर्याच्याच प्रेमात पडतात. पण प्रत्यक्षात महिलांमधले गुणच पुरुषांचे मन जिंकू शकतात.
सौंदर्य हे फक्त काही काळ टिकतं. तुमचे चांगले गुण तुमच्यासोबत मरेपर्यंत असतात. पुढे आपण अशाच गुणांबद्दल जाणून घेणार आहोत.
चाणक्यांच्या मते, नात्याची सुरुवात ही आकर्षणेच होते. मात्र नातं टिकवण्यासाठी तुमच्यात काही गुण असणे गरजेचे आहे.
चाणक्यांच्या मते तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जी महिला भांडणाच्या वेळेस तिच्या रागावर किंवा तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवते अशी महिला कधीच साथ सोडत नाही.
चाणक्यांच्या मते, महिलांनी त्यांच्या भावनेत घेतलेले निर्णय चुकीचे ठरु शकतात. त्यामुळे कोणाचाही अपमान होऊ शकतो.
चाणक्यांच्या मते, ज्या व्यक्तींचा त्यांच्या भावनांवर नियंत्रण नसतं. त्या निष्काळजी असू शकतात.
ज्या महिला कोणालाही वयाचा मान न राखता उद्धटपणे बोलतात, अशांना सासरी नांदणं कठीण होऊन जातं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.