Shreya Maskar
तुमचे जोडीदारासोबत सतत भांडण होत असेल आणि तुम्ही वैतागून ब्रेकअप करत असाल तर आताच थांबा. तुमच्या नात्यात काही गोष्टींचा बदल करा, जेणेकरून नाते गुलाबासारखे फुलेल. चाणक्यांनी सांगितलेले उपाय लक्षात घ्या.
जोडीदार तुमची खरी ताकद आहे. त्याचा आदर करा. परिस्थिती काहीही असो जोडीदाराशी खोटे बोलू नका किंवा फसवणूक करू नका. यामुळे तुमच्या नात्यातील विश्वास तुटतो.
तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नाहीतर आयुष्यातील सर्वात चांगली व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल. कारण रागाचा क्षण नातेसंबंध बिघडू शकतो. काही असो कितीही राग आला तरी शांतपणे प्रतिसाद द्या.
नात्यात कितीही भांडणे झाली, दुरावा आला तरी एकमेकांचा आदर करा आणि कधीही कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करा. एकमेकांच्या मतांचा आदर करा.
अहंकार कोणत्याही नात्याला कमकुवत करतो. म्हणून तुम्ही कितीही पैसे कमवा किंवा कितीही प्रगती करा तरी, तुमच्या नात्यात तुमचा अहंकार प्रतिबिंबित होऊ देऊ नका. यामुळे तुमच्यातील संवाद कमी कमी होत जातो.
चाणक्य नीतीनुसार, नाते आयुष्यभर टिकवण्यासाठी संघर्ष, भांडणे टाळा. भांडणांपेक्षा प्रॉब्लम शोधून त्यावर उत्तर काढा. म्हणजे भांडणाचे कारण मिटेल.
जरी तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये असलात तरी एकमेकांना Spaces द्या. स्वतःसोबत वेळ घालवा. स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.