Bangle Designs : प्रत्येक महिलेकडे 'हा' बांगड्यांचा सेट असायलाच हवा, लग्नापासून ते पूजेपर्यंत सर्व लूकवर दिसेल शोभून

Shreya Maskar

लग्नसराई

आता लग्नसराई आणि सणासुदीचा काळ सुरू आहे. सण समारंभ म्हटले की, महिलांचा साज श्रृंगार आला. प्रत्येक महिला सुंदर आहे आणि तिला समारंभात आणखी सुंदर दिसायचे असते. त्यात दागिने त्यांना खूप आवडतात, तसेच त्यांच्या लूकची शोभा वाढवता

Wedding season | pinterest

बांगड्या

महिलांचा साज श्रृंगार हा बांगड्यांशिवाय अपूर्ण आहे. बांगड्यांचा आवाज मधुर असतो. पूर्वी फक्त काचेच्या बांगड्या मिळायच्या. पण आता बांगड्यांमध्ये देखील विविध प्रकार आणि डिझाइन पाहायला मिळतात.

kundan bangles | pinterest

पारंपरिक लूक

लग्न समारंभ, सण, पूजा या सर्व प्रसंगांना आपण पारंपरिक लूक करतो. हा बांगड्यांचा सेट जर तुमच्याकडे असेल तर प्रत्येक समारंभात तुम्ही उठून दिसाल. 'कुंदन बांगड्या' साडी, ड्रेस आणि लेहेंगा सर्वांवर शोभून दिसतात.

kundan bangles | pinterest

कुंदन बांगड्यांचे प्रकार

कुंदन बांगड्यांमध्ये मीनाकारी कुंदन, पोल्की कुंदन, मोती जडित कुंदन, आणि पारंपरिक गोल बांगड्या यांचा समावेश होतो. लग्न समारंभात कुंदनच्या बांगड्या सुंदर दिसतात.

kundan bangles | pinterest

मोत्यांच्या बांगड्या

मोत्यांच्या बांगड्यांसोबत कुंदनच्या नाजूक बांगड्या घालू शकता. कुंदन बांगड्यांमध्ये डायमंड , स्टोन वर्क आणि मोत्यांचे अत्यंत सुंदर काम पाहायला मिळते.

kundan bangles | pinterest

रंगांचे कॉम्बिनेशन

हेवी कुंदन कडे सोन्याच्या किंवा काचेच्या बांगड्यांच्या मध्ये घालून एक सुंदर सेट तयार करा. हिरवे, लाल, रॉयल ब्लू आणि पांढरे कुंदन डिझाइन्स जास्त चालतात.

kundan bangles | pinterest

वेस्टन लूक

पारंपरिक कुंदन बांगड्या इंडो-वेस्टर्न ड्रेसेस, कुर्ता यांवर एक रॉयल लूक देतात. सिंगल जाड कुंदन कडा खूप आकर्षक दिसतो.

kundan bangles | pinterest

वैशिष्ट्ये

कुंदन बांगड्या त्यांच्या पारंपारिक, शाही आणि कलात्मक रचनेसाठी ओळखल्या जातात. ज्या तुम्हाला एक रॉयल लूक देतात. तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवतात.

kundan bangles | pinterest

NEXT : मॅचिंगची फॅशन झाली जुनी; साडीच्या रंगानुसार 'अशा' निवडा परफेक्ट बांगड्या, तुमच्या सौंदर्याला चारचाँद लागतील

Bangles for Saree | saam tv
येथे क्लिक करा...