Shreya Maskar
साडीत तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी साज श्रृंगार खूप महत्त्वाचा आहे. यात ज्वेलरी देखील येत. आज आपण साडीवर सुंदर बांगड्यांची निवड कशी करावी, जाणून घेऊयात.
साडीत सुंदर लूक हवा असेल तर, मॅचिंग बांगड्या घालू नये. कायम कॉन्ट्रास्ट रंगांच्या बांगड्यांची निवड करावी. यामुळे तुमचे हाताचे सौंदर्य उठून दिसते.
साडीच्या ब्लाउजच्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घाला. म्हणजे तुमचे सौंदर्य खुलेल. तसेच तुमची साडी काठापदराची असेल तर काठाच्या रंगाच्या बांगड्यांची निवड करा.
लक्षात ठेवा जर तुमची साडी प्लेन असेल तर बांगड्यांवर हलकी, नाजूक नक्षी असेल तर छान वाटेल. तर साडी भरजरी असेल तर प्लेन बांगड्या परिधान करा.
साडी कोणतीही असूदे हिरव्या काचेच्या बांगड्या सर्व साडींवर सुंदर दिसतील. तुम्हाला एक मराठमोळा लूक येईल. तसेच हिरव्या बांगड्याचे सौंदर्य जगात भारी आहे.
तुमचा लूक आणखी खुलवायचा असेल तर बांगड्यांच्या सेटमध्ये एक मस्त थोडा मोठा कडा घाला. मोत्यांचे कडे सर्वात सुंदर पर्याय आहे. तसेच तुम्ही बांगड्यांच्या आजूबाजूला गोल्डन आणि सिल्व्हर बांगड्या घालू शकता.
आजकाल ऑक्सिडाइज्ड बांगड्यांचा ट्रेंड प्रचंड वाढताना दिसत आहे. साडी असो वा ड्रेस महिला ऑक्सिडाइज्ड बांगड्यांना पहिला प्राधान्य देतात. तसेच ऑक्सिडाइज्ड बांगड्या सर्व स्किन टोनवर उठून दिसतात. खणाच्या साडीवर ऑक्सिडाइज्ड बांगड्या आवर्जून घाला.
पैठणी किंवा सिल्क साडीवर सोन्याच्या, खड्यांच्या, काचेच्या बांगड्या सुंदर दिसतात. तर नॉर्मल साडीवर काचेचे बांगड्या, मेटल स्टाइल बांगड्या शोभून दिसतात.