Shreya Maskar
चाणक्य यांनी पैसे कमावणे, पैशांचा खर्च आणि गुंतवणूक या विषयांवर उत्तम माहिती दिली आहे, चाणक्य यांच्या मते, पैसे खर्च करणे हे ते कमावण्या इतकेच महत्त्वाचे आहे.पैशाच्या बाबतीत व्यक्तीने केव्हा आणि कुठे सावधगिरी बाळगली पाहिजे, जाणून घेऊयात.
चाणक्य म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर पैसे कसे, कुठे खर्च करायचे आणि पैशांची गुंतवणूक माहित असली पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त बचत करणे अयोग्य आहे.
जास्त काळ पैसा स्थिर राहिल्याने त्याचे मूल्य कमी होते. दान हा पैसा खर्च करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. दान संपत्ती कमी करत नाही तर ती दुप्पट करते. एखाद्याने योग्य कारणांसाठी पैसे गुंतवले पाहिजेत.
चाणक्यांच्या मते, पैशांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. सुरक्षित भविष्यासाठी अनावश्यक खर्चांना आळा घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या कमाईचा एक भाग दान करा आणि दुसरा गुंतवणुकीसाठी वापरा.
पैशाचा लोभ माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. ते पैसे कमविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात आणि कधीही आनंदी राहू शकत नाहीत. त्यांनी कितीही पैसा कमावला तरी तो कमीच वाटतो.
चाणक्य म्हणतात की, संपत्ती मिळवताना कधीही अहंकारी होऊ नये. जे लोक आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगतात ते गरिबीच्या उंबरठ्यावर येतात. पैसा कमवा, दान करा आणि Save करा.
पैसा नेहमीच योग्य मार्गाने कमवला पाहिजे, कारण चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा थोड्या काळासाठी टिकतो. माणसाचा पैसा पाण्यासारखा वाहून जातो. अनावश्यक खर्च कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.