Holi 2026 : होळीचा रंग गेला, पण त्वचा अजून निस्तेज दिसतेय? मग 'हा' घरगुती उपाय करा, चेहरा नव्याने चमकेल

Shreya Maskar

होळी

होळीला रंगांनी खेळून आल्यावर त्वचेची विशेष काळजी घ्या. जेणेकरून त्वचा कोरडी होणार नाही आणि नेहमी चमकत राहील.

Holi | yandex

डेड स्किन

मूग डाळीचा फेसपॅक लावल्याने डेड स्किन निघून जाते. तसेच मूग डाळीमुळे त्वचा मॉइश्चराइज होते. मूग डाळीचा फेसपॅक बनवण्यासाठी मूगडाळ रात्रभर दुधात भिजवा आणि सकाळी मिक्सरमधून त्याची पेस्ट तयार करा.

चेहरा मॉइश्चराइज करा

तयार फेसपॅक १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून मॉइश्चराइज करा. आठवड्यातून दोन- तीन वेळा हा फेसपॅक चेहऱ्याला लावा.

Moisturize | yandex

मूग डाळ फायदेशीर

मूग डाळ त्वचेसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. हे घटक त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, कोलेजन वाढवून तारुण्य टिकवतात.

Skin Care | yandex

पिंपल्स गायब

रात्रभर भिजवलेली मूग डाळ आणि तूप मिक्सरला वाटून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे पिंपल्स, काळे डाग, चेहऱ्यावरील लाल चट्टे या सर्व समस्या दूर होतील.

Pimples | yandex

टॅन कमी होते

चेहर्‍यावरील टॅन कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर ठरते. मूग डाळीच्या पेस्टमध्ये दही आणि कोरफड मिसळा. चेहर्‍याला आणि हातात-पायाला लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा.

Reduces tan | yandex

सुरकुत्या कमी

मूग डाळमधील व्हिटॅमिन A आणि C मुळे त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होतात. मूग डाळ त्वचेला हायड्रेट करून त्वचा मुलायम आणि मऊ बनवते.

Reduces wrinkles | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

disclaimer | yandex

NEXT : होळी खेळण्यापूर्वी केसांना लावा 'हा' पदार्थ, नाहीतर केस होतील खराब अन् चमक होईल गायब

Holi 2026 | yandex
येथे क्लिक करा...