Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी केसांना लावा 'हा' पदार्थ, नाहीतर केस होतील खराब अन् चमक होईल गायब

Shreya Maskar

होळी

यंदा होळी हा सण 3 मार्चला आला आहे. रंगपंचमीला एकमेकांना रंग लावले जातात. होळा या सणाला त्वचेसोबत केसांची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून केस खराब होणार नाही.

Holi | yandex

केस

केसांचा वरचा थर खूप संवेदनशील असतो. जेव्हा रासायनिक रंग त्यावर चिकटतात तेव्हा त्यांची आर्द्रता कमी होते. यामुळे केसांची चमक जाते आणि केस कमकुवत होतात.

hair care | yandex

नारळाचे तेल

रंगपंचमीच्या आदल्या रात्री केसांना नारळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा बदाम तेल लावा. तेल टाळूला पोषण देते आणि केस तुटण्यापासून थांबवते.

Coconut oil | yandex

तेलाचे फायदे

तेल रंग सहजपणे काढून टाकण्यास देखील मदत करते. मोकळे केस केवळ जास्त रंग शोषून घेत नाहीत तर गुंता वाढवतात. तसेच केस तुटण्याचा धोका देखील वाढवतो.

Oil | yandex

वेणी

होळीला रंग खेळायला जाताना वेणी, बन किंवा पोनीटेल घाला. फॅशनसाठी केस मोकळे सोडू नका. यामुळे केस खूप जास्त कोरडे देखील होतात.

Braids | yandex

केसांना मालिश करा

रंग खेळून आल्यावर केसांना थोडे तेल लावा आणि रंग सैल करण्यासाठी हलक्या हाताने मालिश करा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. केस धुतल्यानंतर कंडिशनर किंवा केसांचा मास्क वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे केसांचा ओलावा परत येतो.

Massage your hair | yandex

कोरडे केस

होळीनंतर काही दिवस हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरणे टाळा. केसांना कमी उष्णता द्या. केस पंख्याखाली कोरडे करा. केसात पाणी राहणार नाही, याची काळजी घ्या.

hair care | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

hair care | yandex

NEXT : होळीला पांढरेच कपडे का घालतात? जाणून घ्या कलरफुल सणाच्या ड्रेस कोडचा खरा अर्थ

Holi 2026 | saam tv
येथे क्लिक करा...