Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि जीवनातले योग्य मार्गदर्शक व्यक्तीमत्व आहेत.
चाणक्यांनी चांगली आणि विश्वासू जी तुम्हाला भविष्यात मागे खेचतील, अशा व्यक्तींना कसं ओळखाल? आणि त्यांच्यासोबतने तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे जाणून घेऊयात.
तुमची चांगली सोबत तुम्हाला नेहमीच साथ देते. त्यामुळे तुम्ही पुढील व्यक्तींपासून लांब जाणं किंवा वैर घेणं टाळा. त्याने तुमच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात.
जे लोक नकारात्मक विचार करतात, त्यांना प्रत्येक गोष्टीत उणिवाच दिसतात. सतत तक्रारी, नाराजी आणि नकारात्मक बोलण्यामुळे तुमचाही मूड बिघडतो. सकारात्मक विचारसरणी टिकवण्यासाठी अशांपासून दूर राहा.
नात्याचा पाया विश्वासावर असतो. पण काही लोक विनाकारण खोटे बोलतात. गरज पडल्यास ते तुमच्याविरुद्धही जाऊ शकतात. अशांवर अति विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकते.
टॅलेंट असलं तरी मेहनतीची सवय नसेल तर प्रगती होत नाही. आळशी लोकांसोबत काम केल्याने तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात. त्यामुळे मेहनत आणि शिस्तप्रिय लोकांची संगत ठेवा.
लहानसहान गोष्टींवरून भडकणारे लोक वातावरण तणावपूर्ण करतात. अशा स्वभावामुळे मानसिक शांतता भंग होते. शांत आणि संयमी लोकांशी मैत्री ठेवणं जास्त फायद्याचं आहे.
काही जण मैत्री फक्त दिखाव्यासाठी करतात. वेळ आली की ते फक्त स्वतःचा फायदा पाहतात. अशा नात्यांमुळे भावनिक दुखापत होऊ शकते.
जे लोक सतत इतरांची टीका किंवा चुगली करतात, ते तुमच्याबद्दलही तसेच बोलू शकतात. अशा व्यक्तींमुळे नातेसंबंध बिघडू शकतात.