Sakshi Sunil Jadhav
सगळ्यात हुशार आणि यशाचे मार्ग दाखवणारे आचार्य चाणक्य हे सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यांनी भविष्यात कोणत्या गोष्टींपासून लांब राहीलं पाहिजे याबद्दल सांगितलं आहे.
चाणक्य सांगतात की ज्या ठिकाणी रोजगार, व्यापार किंवा उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, तिथे थांबू नका. गरजा भागत नसल्यास व्यक्ती स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाही.
भीती, गुन्हेगारी किंवा असुरक्षितता असलेल्या ठिकाणी राहणं टाळा. अशा वातावरणात मानसिक ताण वाढतो आणि कुटुंबाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.
जिथे लोकांना समाज किंवा कायद्याची भीती नसते, तिथे अन्याय आणि अराजकता वाढते. चाणक्यांच्या मते, कायद्याचा सन्मान असलेले ठिकाणच सुरक्षित असते.
ज्या ठिकाणी शिस्त, संस्कार आणि लाज नसते, तिथे सन्मान मिळत नाही. मर्यादित आणि संस्कारी वातावरण व्यक्तिमत्त्व घडवते.
स्वार्थी लोकांच्या परिसरात राहिल्याने अडचणीच्या वेळी साथ मिळत नाही. परोपकारी समाजच सुख-दुःखात साथ देतो.
दान आणि मदतीची वृत्ती नसलेल्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा नसते. दान केल्याने समाजात आपुलकी आणि विश्वास वाढतो.
त्याग आणि सद्भाव नसल्याने समाजात स्पर्धा, मत्सर आणि भांडणं वाढतात. चाणक्य म्हणतात, दानशूर आणि उदार लोकांमध्येच प्रगती शक्य आहे.