Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की त्यांची मुलं आयुष्यात यशस्वी व्हावीत, त्यांना मान-सन्मान आणि चांगले करिअर मिळावे. फक्त चांगले शिक्षण आणि पैसा पुरेसा नसतो.
प्राचीन तत्त्वज्ञ आचार्य चाणक्य यांनी मुलांच्या संगोपनाबाबत अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. या गोष्टी आजही पालकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
मुलांच्या आयुष्यातील पहिली पाच वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात त्यांना भरपूर प्रेम आणि जिव्हाळा मिळाला तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
लहानपणापासून मुलांना शिस्तीची सवय लावा. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगा ही पालकांची जबाबदारी असते.
मुलांना लहानपणापासून काही नियम पाळायला शिकवा. घरातील छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या दिल्याने त्यांच्यात जबाबदारीची भावना विकसित होते.
मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यावर हुकूम चालवण्याऐवजी त्यांच्याशी मित्रासारखे वागा. त्यामुळे ते मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगतात.
फक्त अभ्यासावर लक्ष देणं पुरेसं नाही. मुलांना जीवनातील विविध परिस्थितींमध्ये कसे विचार करायचे आणि निर्णय कसे घ्यायचे हे शिकवणे महत्त्वाचे आहे.
मुलांनी प्रश्न विचारले तर त्यांना थांबवू नका. त्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन दिल्यास त्यांची बौद्धिक क्षमता वाढते.
मुलं कोणत्या मित्रांच्या सहवासात आहेत याचा त्यांच्या स्वभावावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी त्यांच्या संगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.