

वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला
अवघ्या ३६ चेंडूच ठोकलं शतक
वैभवच्या फलंदाजीचं सर्वत्र कौतुक
आयपीएलच्या ३६ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या विरोधात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या ३६ चेंडूत हैदराबादच्या विरोधात शतक ठोकलं. वैभव आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या इतिहासात दुसरं शतक ठोकलं आहे. त्याने मागील वर्षी गुजरात टायटन्सविरोधात ३५ चेंडूत शतक ठोकलं. त्याने आयपीएलच्या सीझनमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये सामना झाला. वैभव सूर्यवंशीने बाद होण्यापूर्वी ३७ चेंडूत १०३ धावांची भागीदारी रचली. शतक ठोकल्यानंतर साकिब हुसैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. वैभवने या सामन्यात गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. त्याने ५ चौकार आणि १२ षटकारांच्या जोरावर शतक पूर्ण केलं. १५ वर्षीय आक्रमक फलंदाज वैभवने २७८.३८ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
सर्वाधिक जलद शतक ठोकण्यात ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्याने पुणे वॉरियर्स विरोधात ३० चेंडूत शतक ठोकलं होतं. आयपीएलच्या मागील सिझनमध्ये वैभवने गुजरात टायटन्सविरोधात ३५ चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर काल झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३६ चेंडूत शतक पूर्ण केलं.
सर्वाधिक जलद शतक करण्याच्या यादीत युसूफ पठाण चौथ्या स्थानावर आहे. त्याने २०१० साली राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सच्या विरोधात ३७ चेंडूत शतक ठोकलं होतं. तर पाचव्या स्थानावर हेनरिक क्लासेन आहे. हेनरिकने २०२५ साली कोलकाता नाइट रायडर्सविरोधात ३७ चेंडूत शतक ठोकलं होतं.
ख्रिस गेल - २०१३ साली ३० चेंडूत पुणे वॉरियर्स विरोधात शतक
वैभव सूर्यवंशी - २०२५ साली ३५ चेंडूत गुजरात टायटन्सविरोधात शतक
वैभव सूर्यवंशी - २०२६ साली ३६ चेंडूत सनरायजर्सविरोधात शतक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.