अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा तडाखा; जगातील सगळ्यात टॉप गोलंदाजाला चांगलाच धुतला, व्हिडिओ तुफान व्हायरल

vaibhav suryavanshi News : वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराहची जोरदार धुलाई केली आहे .
vaibhav suryavanshi batting
vaibhav suryavanshi Saam tv
Published On
Summary

वैभव सुर्यवंशी पुन्हा चमकला

सगळ्यात टॉप गोलंदाजाला वैभवने धुतला

वैभवच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा तडाखा पाहायला मिळाला. वैभवने जगातील सगळ्यात टॉप गोलंदाज जसप्रीत बुमराह्च्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याच षटकातील चौथ्या चेंडूवरही जोरदार षटकार लगावला. वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सदरम्यान झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने आले. वैभव सूर्यवंशीने जगातील चांगल्या गोलंदाजाची धुलाई केली आहे. वैभव सूर्यवंशीने काल झालेल्या सामन्यात जसप्रित बुमराहला देखील चांगलाच झोडला. त्याने पहिल्याच षटकात दोन षटकार लगावले.

पावसामुळे मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान ११-११ षटकांचा सामना झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जायस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी सुरू केली.

vaibhav suryavanshi batting
RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

यशस्वीने दीपक चाहरच्या पहिल्याच षटकात २० धावा कुटल्या. त्यानंतर जसप्रीत बुमाराह गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी वैभव सूर्यवंशीने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत स्वागत केलं. वैभवने २७८.५७ च्या स्ट्राइक रेटने १४ चेंडूत ३९ धावा कुटल्या. त्याने ६ षटकार आणि १ चौकार लगावला.

vaibhav suryavanshi batting
IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

वैभवने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावून तडाखा दाखवला. यशस्वी जायस्वालने देखील आक्रमक फलंदाजी केलं. डावखुरा फलंदाज असलेल्या यशस्वीने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना ३२ चेंडूत ७७ धावा कुटल्या. यशस्वीने १० चौकार आणि ४ षटकार लगावले. राजस्थान रॉयल्सने १५० धावापर्यंत धावसंख्या नेली. यशस्वीने आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत १७० धावसंख्या केल्या आहेत. त्याच्याकडेच आता ऑरेंज कॅप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com