

राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर मिळवला विजय
राजस्थान रॉयलची विजयी सलामी
चेन्नई सुपर किंग्स संघ पहिल्याच सामन्यात ढेर
आयपीएल स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चैन्नई सुपर किंगवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने राजस्थान रॉयल्स सहज विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. या सामन्यात चेन्नईने दिलेल्या धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्सने ८ गडी राखून पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव होऊ लागला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा अत्यंत महत्वाचा सामना गुवाहाटीत झाला. नाणेफेकीपूर्वीच पावसानं व्यत्यय आणला. नाणेफेक राजस्थान संघानं जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. होमग्राउंडवर झालेल्या सामन्यात राजस्थाननं जबरदस्त गोलंदाजी केली. चेन्नईच्या ११ धुरंधरांना अवघ्या १२७ धावांत गुंडाळलं.
टी २० वर्ल्डकपमध्ये धमाका करणाऱ्या संजू सॅमसनच्या खेळीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण राजस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी कुणालाच जास्त वेळ मैदानावर तग धरू दिला नाही. संजू सॅमसनला तर गोलंदाजांनी ब्लॉक करून ठेवलं होतं. सॅमसननं सात चेंडूंचा सामना केला. त्यात फक्त सहा धावाच करता आल्या. त्यात फक्त एकच चौकार होता.
वर्ल्डकपमध्ये दोनशेपेक्षा जास्त स्ट्राइकने खेळणाऱ्या संजूचं आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शंभरपेक्षा कमी स्ट्राइक रेट होता. सहा धावांवर बर्जरने त्याला बाद केले. तर त्याच्यासोबत सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड देखील फार काही करू शकला नाही. अवघ्या सहा धावांवर त्याला जोफ्रा आर्चरने तंबूत धाडलं.
वन डाउनला आलेल्या आयुष म्हात्रेला तर खातंही उघडू दिलं नाही. त्याला बर्जरने ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. त्यानंतर शॉर्टला अवघ्या दोन धावांवर संदीप शर्माने बाद केले. यशस्वी जयस्वालने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेल्या सरफराजला रविंद्र जडेजाने पायचीत केले आणि चेन्नईच्या संघाची कंबर मोडली. त्यानं १२ चेंडूंत १७ धावा केल्या. चेन्नईचा अर्धा संघ अवघ्या ५१ धावांत तंबूत परतला होता.
वर्ल्डकपमध्ये चमकणाऱ्या शिवम दुबेला देखील स्थिरावू दिलं नाही. त्याला देखील सहा धावांवर बाद केले. रविंद्र जडेजानं त्याला तंबूत धाडलं आणि उरलीसुरली आशा संपुष्टात आणली. त्याचवेळी आलेल्या ओव्हर्टननं एका बाजूनं खिंड लढवली. शेवटच्या षटकापर्यंत तो मैदानात थांबला. त्यानं अत्यंत महत्वाची अशी ४३ धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र त्याला साथ देता आली नाही. चेन्नईच्या धुरंधरांना राजस्थानच्या गोलंदाजांनी अवघ्या १२७ धावांवर रोखले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.