

आयपीएलच्या १३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे तीन १३ वाजले. आपल्या फूल फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने पाचवेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाला गुडघे टेकायला लावले. मुंबई इंडियन्सच्या संघाचा २७ धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव आहे, तर राजस्थानच्या संघाने विजयाची हॅट्रिक केली आहे. सामन्याच्या सुरुवातीपासून राजस्थान संघाने मुंबईला दबावात ठेवलं.
दुसरीकडे पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या खेळडूंचा आत्मविश्वास तुलनेने कमी दिसला. विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी संभाळणारे तीन-तीन खेळाडू मुंबईच्या संघात आहेत. पण तेही या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले. हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव हे तिन्ही खेळाडू राजस्थानच्या गोलंदाजीसमोर अपयशी ठरले.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२६) चा १३ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणला होता. पाऊस उघडल्यानंतर षटकांमध्ये कपात करत प्रत्येकी केवळ ११ षटकांचा सामना झाला. मुसळधार पावसामुळे सामना सुमारे अडीच तास उशिरा सुरू झाला होता.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने वैभव आणि यशस्वी यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबईसमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवले.
राजस्थानच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. हार्दिक, रोहित शर्मा, सूर्याकुमार, तिलक वर्मा सारखे खेळाडूंनी नांगी टाकल्यानंतर शेरफेन रदरफोर्ड आणि नमन धीर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि मुंबईला बॅकफूटवर ढकलले. डावाच्या ९व्या षटकापर्यंत मुंबईने १०३ धावा केल्या होत्या. आणि सात गडी गमावले होते. पुढील दोन षटकांतही गडी बाद होण्याचा सत्र चालूच राहिले आणि ११ व्या षटकाच्या अखेरीस मुंबईनं ९ वा गडी गमावत १२३ धावांपर्यंत मजल मारली. या हंगामातील मुंबईचा सलग दुसरा पराभव होता.
दरम्यान सामन्याच्या सुरुवातीला जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात रायन रिकेल्टनला केवळ ८ धावांवर बाद केले. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला सूर्यकुमार यादवही फक्त ६ धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तोही तिसऱ्याच षटकात केवळ ५ धावा करून बाद झाला. त्याला संदीप शर्माने पायचीत केले.
यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर अनेकांच्या अपेक्षा होता. हार्दिक आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे तो हा सामना सहजपणे जिंकवून देईल, असं वाटलं. पण पाचव्या षटकात हार्दिक पांड्या मोठी खेळी न करता बाद झाला. तो केवळ नऊ धावा करू शकला. त्यालाही रवी बिश्नोईने बाद केलं. त्यानंतर त्याच षटकात तिलक वर्माही बाद झाला. त्याने १४ धावा केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.