World Cup: जय शाहांच्या दबावामुळे श्रीलंका क्रिकेट बर्बाद; श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा आरोप

Arjun Ranatunga : जय शाह यांचे वडील हे भारताचे गृहमंत्री आहेत. अमित शहा यांच्यामुळेच जय शाह यांचा बीबीसीआयवर मोठा प्रभाव आहे.
Arjun Ranatunga
Arjun RanatungaSaam Tv
Published On

Arjun Ranatunga Allegation On Jay Shah:

आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचे साखळी सामने संपले आहेत. या स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघाचं खराब कामगिरी राहिली. इतकेच नाही तर श्रीलंकेला सर्वात मोठा धक्का मिळाला तो म्हणजे क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व निलंबित होणं. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व रद्द होण्यावरून श्रीलंकेचे माजी कर्णधार आणि वर्ल्ड कप विजेते अर्जुन रणतुंगा संतापले आहेत. रणतुंगा यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Latest News)

भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली बोर्ड आहे, हे सर्वांना माहितीये. मात्र बीसीसीआय आणि त्याचे पदाधिकारी दुसऱ्या देशाचे क्रिकेट बोर्डही चालवतात, असा आरोप रणतुंगा यांनी केलाय. जय शाह यांचे वडील हे भारताचे गृहमंत्री आहेत. अमित शहा यांच्यामुळेच जय शाह यांचा बीबीसीआयवर मोठा प्रभाव आहे. जय शाह यांनी दबाव आणून राष्ट्रीय क्रिकेट सेटअप खराब केल्याचा आरोप रणतुंगा यांनी केलाय. डेली मिरर या वृत्त संस्थेशी बोलताना अर्जुन रणतुंगा यांनी हे आरोप केले आहेत.

श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या ज्या संकटांचा सामना करत आहे, त्यासाठी जबाबदार जय शाह आहेत. “श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि जय शाह यांच्यातील संबंधांमुळे बीसीसीआय श्रीलंका क्रिकेट बोर्डावर नियंत्रण मिळवण्याच्या विचारात आहे, असाही आरोप रणतुंगा यांनी केलाय. “जय शाह श्रीलंका क्रिकेट चालवत आहेत. जय शाह यांच्या दबावामुळे श्रीलंका क्रिकेट बर्बाद होत आहे.

भारतात एक व्यक्ती श्रीलंका क्रिकेट बर्बाद करत आहे. ते फक्त आपल्या वडिलांमुळे जे शक्तिशाली आहेत. ते भारताचे गृहमंत्री आहेत.”असं रणतुंगा डेली मिरर या वृत्तसंस्थेशी बोलातना म्हणालेत. दरम्यान, या वर्ल्डकपच्या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने खराब कामगिरी केलीय. श्रीलंकेने ९ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकले. तसेच ७ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

यामुळे फक्त ४ गुणांसह ते पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी राहिले. यामुळे श्रीलंकेच्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पात्र होता आले नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय होण्याच्या नियमानुसार, जो संघ वर्ल्ड कप २०२३ 3 स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये ८ व्या स्थानाच्या खाली राहील, त्याला स्पर्धेसाठी क्वालिफाय करता येणार नाही.

Arjun Ranatunga
World Cup: कोण विराट कोहली म्हणणाऱ्या मेंडिसला पॅकअप झाल्यानंतर आलं शहाणपण; म्हणाला मी चुकीचं बोललो...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com