Rishabh Pant : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट; बीसीसीआय अधिकाऱ्याच्या माहितीमुळे चाहत्यांची निराशा होणार

शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंत जवळपास 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
Rishabh Pant Health Update
Rishabh Pant Health UpdateSAAM TV
Published On

Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतच्या अपघातात त्यांच्या क्रिकेट करिअरबाबत सातत्याने चर्चा होत आहे. ऋषभ टीम इंडियात कधी पुनरागमन करेल याकडे सगळ्यांचा लक्ष आहे. मात्र ऋषभचं भारतात वापसी लांबली जाऊ शकते. कारण सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आता ऋषभच्या गुडघ्याच्या आणि घोट्यावर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. त्यामुळे तो जवळपास ९ महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

गुडघा आणि घोट्याच्या दुखापतीनंतर पंतवर दुहेरी शस्त्रक्रिया होणार आहे. बुधवारी पंतला बीसीसीआयने डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट केले. आता शस्त्रक्रियेसाठी पंतला लंडनला नेलं जाऊ शकतं. मात्र, तो कधी जाणार याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंत जवळपास 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

Rishabh Pant Health Update
Ind Vs SL: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, 'या' पुणेकर खेळाडूला मिळाली पदार्पणाची संधी

इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतला डेहराडूनहून मुंबईत आणण्यात आले आहे कारण त्याला विश्रांतीची गरज होती, डेहराडूनमध्ये हे शक्य नव्हते. येथे तो हाय सिक्युरिटीमध्ये असेल आणि केवळ कुटुंबातील सदस्यच त्याला भेटू शकतील. (Indian Cricket Team)

Rishabh Pant Health Update
Ind vs Pak : ठरलं तर...; टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, सामने किती आणि कधी होणार?

अधिकाऱ्याने सांगितले, एकदा डॉक्टरांना वाटले की तो प्रवासासाठी योग्य आहे, तेव्हा त्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठवले जाईल. त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप आम्हाला माहीत नाही. सूज कमी झाल्यानंतर डॉक्टर उपचाराचा मार्ग ठरवतील. पंतला गुडघा आणि घोट्याच्या दोन्ही शस्त्रक्रियेची गरज आहे. यासाठी त्याला जवळपास नऊ महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागेल.

अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, सध्या आम्ही त्याच्या कमबॅक बद्दल नाही तर रिकव्हरीकडे लक्ष देत आहोत. त्याला बरे होऊ द्या. त्यानंतर तो नक्की संघात वापसी करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com