भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकप २०२३ चा सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने न्यूजीलंडच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूजीलंडने भारतासमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज शुबमन गिलने मोठा विक्रम केलाय. धर्मशालेच्या स्टेडिअमवर खेळताना गिलने पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमला पिछाडलं आहे. (Latest News)
शुबमन गिल वनडेमध्ये सर्वात जलद २ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. गिलने हा विक्रम धर्मशाला येथे खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध २०२३ च्या वनडे वर्ल्डकपच्या सामन्यात केला. गिलने फक्त बाबरचं नाही तर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू हाशिम अमलालाही मागे टाकले आहे. अमलालाने ४० डावांमध्ये हा आकडा गाठला होता. परंतु गिलने २००० धावा करण्यासाठी फक्त ३८ डावांमध्ये ही कामगिरी केली.(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)
शुबमन गिल एकदिवसीय वर्ल्डकपमधला तिसरा सामना खेळत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने या स्पर्धेत पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यात त्याने १६ धावा केल्या. यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ५३ धावांची खेळी केली. आता तो न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना खेळला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा माजी दिग्गज झहीर अब्बास आहे. याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन, सध्याचा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा मधल्या फळीतील फलंदाज रॅसी वॅन डर डुसेन आहे. या सर्व फलंदाजांनी एकदिवशीय सामन्यात २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी तब्बल ४५ डाव खेळले. परंतु शुबमन गिलला २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ३८ डाव खेळाव्या लागल्या.
दरम्यान वर्ल्डकपच्या आधी खेळलेल्या आशिया चषकात गिल हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. गिलने ६ सामन्यांच्या ६ डावात ७५.५० च्या सरासरीने ३०२ धावा केल्या, होत्या. यात २ अर्धशतके आणि १ शतकाचा समावेश आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारे फलंदाज
शुबमन गिल - ३८ डाव
हाशिम अमला- ४० डाव
जहीर अब्बास- ४५ डाव
केविन पीटरसन - ४५ डाव
बाबर आझम - ४५ डाव
रॅसी वॅन डर डुसेन- ४५ डाव
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.