World Cup: कोण विराट कोहली म्हणणाऱ्या मेंडिसला पॅकअप झाल्यानंतर आलं शहाणपण; म्हणाला मी चुकीचं बोललो...

Kusal Mendis : कुसल मेंडिसला शहाणपण आलं असून त्याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
Kusal Mendis
Kusal MendisICC World cup Twitter
Published On

Captain Kusal Mendis Apologized To virat kohli:

वर्ल्ड कपच्या स्पर्धेत श्रीलंकेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केलीय. या स्पर्धेत श्रीलंकेने ९ पैकी फक्त २ सामने जिंकले. तर ७ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे वर्ल्ड कपमधून पॅकअप झालं आहे. याचदरम्यान श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला शहाणपण सुचलंय. विराट कोहलीचं आपण कौतुक केलं पाहिजे होतं, असं मेंडिसला वाटू लागलंय. (Latest News)

दरम्यान वर्ल्ड कप असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व निलंबित केलं आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आयसीसीने केला. वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचं आव्हान असताना कर्णधार कुसल मेंडिसचं एक विधान खूप चर्चेत आलं होतं. भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीवर त्याने हे विधान केलं होतं. आता कुसल मेंडिसला शहाणपण आलं असून त्याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वर्ल्ड कप २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९ वे शतक झळकावून इतिहास रचला. या शतकानंतर विराटने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली होती. त्यानंतर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. यादरम्यान कुसल मेंडिसला विराटच्या शतकाविषयी एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. विराटच्या कामगिरीबद्दल त्याला अभिनंदन करणार का, असा प्रश्न करण्यात आला होता.

त्यानंतर मेंडिस म्हणाला विराट कोहली कोण आहे आणि मी त्याचे अभिनंदन का करू? त्यानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता या प्रकरणावर त्यांचे नवीन विधान समोर आले आहे, ज्यात त्यांनी खेद व्यक्त केलाय.

“पत्रकार परिषदेदरम्यान मला माहित नव्हतं की कोहलीने त्याचे ४९ वे शतक झळकावले आहे, जेव्हा पत्रकाराने अचानक विचारले, मला काय बोलावे ते समजले नाही आणि मला प्रश्न देखील समजला नाही – ४९ शतक करणं सोपे नाही – मी काय बोललो ते चुकीचे होते, मला ते जाणवले." दरम्यान विराट कोहलीने ४९ वे शतक केल्याचं मेंडिसला सांगण्यात आले होते त्यावेळी त्याने खूप विचित्र प्रतिक्रिया दिली होती.

श्रीलंका क्रिकेट बोर्डावर कारवाई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व निलंबित केलं आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आयसीसीने केला. बोर्डाच्या व्यवहारांचं स्वायत्तपणे व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे, मात्र या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप होतोय का? असा सवाल करत याबाबत खात्री करणं आवश्यक असल्याचं आयसीसीने म्हटलं होतं.

Kusal Mendis
World Cup : शुभमन गिलंनं २०२३ वर्ष गाजवलं; केली विराटलाही न जमलेली कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com