World Cup : शुभमन गिलंनं २०२३ वर्ष गाजवलं; केली विराटलाही न जमलेली कामगिरी

Shubman Gill : शुभमनने ३० चेंडूमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने अर्धशतक केलं.
Shubman Gill
Shubman Gill Saam Tv Twitter
Published On

Shubman Gill Record :

आज बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामीच्या मैदानावर टीम इंडिया आणि नेदरलँडचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने आक्रमक सुरूवात करत या दोघांनी १२ षटकांचा आत १०० धावा केल्या होत्या. (Latest News)

रोहितने जोरदार फटकेबाजी करत अनेक विक्रम केलेत. त्यात शुभमनने या सामन्यात ५२ धावा करत मोठा विक्रम नोंदवला. त्याच्या खेळीमुळे तो थेट सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. विशेष म्हणजे हा विक्रम विराट कोहलीलाही करता आलेला नाही. काय आहे हा विक्रम जाणून घेऊ ..

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फटकेबाजी करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघासाठी ९१ धावा जोडल्या. शुभमनने ३० चेंडूमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने अर्धशतक केलं. गिल अजून मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असताना १२ व्या षटकात पॉल व्हॅन मीकेरेनने भारताला गिलच्या रुपात पहिला धक्का दिला. दरम्यान या वर्षात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाचव्यांदा १०० धावांची भागीदारी केलीय.

त्याचप्रमाणे शुभमनने २०२३ हे वर्ष गाजवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १५०० प्लस धावा केल्या आहेत. तर गिलने या वर्षात २००० धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी २७ इनिंगमध्ये गिलने या धावा केल्या आहेत. याआधी सचिन तेंडुलकर याने १५०० प्लस धावा कमी इनिंगमध्ये केल्या होत्या.

मॅथ्यू हेडन याच्या विक्रमाशी गिलने आज बरोबरी केलीय. दरम्यान शुभमन गिल हा कॅलेंडर वर्षात एकदिवसीय सामन्यात १५०० प्लस धावा करणारा भारताचा चौथा फलंदाज ठरलाय. विशेष म्हणजे कॅलेंडर वर्षात विराट कोहलीला एकदाही १५०० धावा करता आल्या नाहीत. सचिन तेंडुलकरने दोनवेळा, सौरव गांगुली,राहुल आणि शुभमन गिलने एकदा ही कामगिरी केलीय.

सचिन तेंडुलरकरने १९९८ मध्ये १८९४ तर १९९६ मध्ये १६११ धावा केल्या होत्या. सौरव गांगुलीने १९९९ मध्ये १७६७ आणि राहुल द्रविडने १९९६ मध्ये १७६१ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने २०२३ वर्षातील ५९ वा षटकार ठरला. यासह त्याने वनडे एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात एबी डिविलियर्सला मागे सोडलं आहे.

Shubman Gill
Video: अरे व्वा! शुभमन गिलचा लांबलचक षटकार; चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com