ENG vs NED: वर्ल्डकपच्या शेवटी इंग्लंडला विजयाचा सूर गवसला; १६० धावांच्या फरकाने नेदरलँडचा पराभव

ENG vs NED: विश्वचषकाच्या आज बुधवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने नेदरलँडला मात देत तब्बल १६० धावांच्या फरकाने विजय मिळवला.
ENG vs NED
ENG vs NEDSaam tv
Published On

ENG vs NED:

विश्वचषकाच्या आज बुधवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने नेदरलँडला मात देत तब्बल १६० धावांच्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने विश्वचषकात दुसरा विजय मिळवला आहे. या आधी इंग्लंडने बांगलादेशला पराभूत केले होते. (Latest Marathi News)

विश्वचषकाच्या ४० सामन्यात बेन स्टोक्सने आक्रमक खेळी करत शतकी खेळी खेळली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून ३३९ धावा काढल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


ENG vs NED
Hasin Jahan Statement: 'मी टीम इंडियाला शुभेच्छा देईल,पण...'मोहम्मद शमीच्या बायकोने केले विचित्र विधान; Video व्हायरल

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ १७९ धावांवर ढेपाळला. तेजाने नेदरलँडसाठी सर्वाधिक धावा काढल्या. तर इंग्लंडकडून मोईन अली-आदिल रशीदने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. नेदरलँडचा पराभव करत विश्वचषकाच्या गुणतालिकेत इंग्लंड संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे नेदरलँडचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.

ENG vs NED
World Cup 2023: न्यूझीलंड,पाकिस्तान की अफगाणिस्तान? टीम इंडियासोबत सेमीफायनलमध्ये कोण भिडणार? वाचा समीकरण

नेदरलँडने आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्या सलामीवीरांना चांगली सुरुवात केली नाही. पाचव्या षटकात मॅक्सने क्रिस वोक्सला बाद केलं. त्यानंतर कोलिनही बाद झाला. बारेसीने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फारसं यश आलं नाही. त्याने ६२ चेंडूत ३७ धावा कुटल्या. अॅडवर्डला बाद झाल्यानंतर नेदरलँडची पडझड सुरुच राहिली. अखेर नेदरलँडचा संघ १७९ धावांवर ढेपाळला. यानंतर इग्लंडने तब्बल १६० धावांनी सामना जिंकला.

ENG vs NED
ICC Ranking : शुभमन गिल, मोहम्मद सिराजची मोठी झेप; पाकिस्तानी खेळाडूंना दणका देत ICC क्रमवारीत अव्वल स्थानी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com