विश्वचषकात टीम इंडियाची चांगली कामगिरी सुरु आहे. विश्वचषकात टीम इंडियाने सलग आठ सामने जिंकले आहेत. दिवाळीच्या दिवशी टीम इंडिया ही नेदरलँडचा पराभव करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाच्या सलामीवीरांनी प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली आहे. याचदरम्यान, याचवेळी शुभमन गिलने फलंदाजी करताना लांबलचक षटकार लगावला आहे. या षटकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)
टीम इंडियाची बेंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँडच्या विरोधात साखळी फेरीतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने आतापर्यंत ८ सामने जिंकले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारतीय संघ ९ वा सामना देखील जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाचाही ९ वा सामना जिंकण्याचा प्रयत्न राहणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. या सामन्याच्या सुरुवातीला टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने एक लांबलचक षटकार मारला.
आजच्या सामन्यात नेदरलँडकडून तिसरं षटक आर्यन दत्त टाकत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूत गिलने पुढे येऊन लांबलचक षटक मारला. शुभमनने मारलेला चेंडू थेट स्टेडियम बाहेरील पार्किंगमध्ये पोहोचला. शुभमन गिलने थेट ९५ मीटर षटक मारला.
शुभमनने लांबलचक षटक मारल्यानंतर त्याने त्याचा आक्रमक खेळ सुरुच ठेवला. गिलने सहाव्या षटकातील पहिल्या चेंडूत चौकार लगावला. तर तिसऱ्या चेंडूवर आणखी एक षटकार लगावला. गिलने मारलेला हा षटकार देखील लांबलचक होता. शुभमन या सामन्यात ५१ धावा करून तंबूत परतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.