Team India: टीम इंडियाची 'वर्ल्डकप'वाली दिवाळी! खेळाडूंसह पत्नी आणि मुलांनीही लावली हजेरी;पाहा Video

Team India Diwali Celebration: भारतीय संघातील खेळाडूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
Team India Diwali Celebration
Team India Diwali Celebrationtwitter/BCCI
Published On

Team India Diwali Celebration Video:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरा करताना दिसून आले आहेत. दिवाळीच्या दिवशी भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहेत.

त्यामुळे एक दिवसापूर्वीच भारतीय संघातील खेळांडूनी आणि स्टाफमधील सदस्यांनी दिवाळी साजरी केली. बंगळुरुतील हॉटेमध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या पार्टीत क्रिकेटपटू आणि स्टाफमधील सदस्य आपल्या पत्नींसह दिसून आले. या सेलिब्रेशन पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सेलिब्रेशन पार्टीचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आपल्या पत्नी आणि मुलीसह असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर रविंद्र जडेजा आपल्या पत्नीसह एन्ट्री करताना दिसून येत आहे. शार्दुल ठाकुर पासून ते विराट कोहली सर्व क्रिकेटपटू आपल्या पत्नींसह दिवाळी साजरा करताना दिसून येत आहे.

तर इशान किशनसारखे युवा क्रिकेटपटू शुभमन गिल आणि शार्दुल ठाकुरची पायखेची करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, भारतीय खेळाडूंनी पारंपारिक कुर्ता परिधान केला आहे. तसेच भारतीय खेळाडू क्रिकेट चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. (Latest sports updates)

Team India Diwali Celebration
IND vs NED: दिवाळी धमाका करण्यासाठी टीम इंडिया मैदानात! टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय; पाहा प्लेइंग ११

भारत- नेदरलँड येणार आमने सामने..

भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होईल. भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ८ पैकी ८ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. १६ गुणांसह भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

Team India Diwali Celebration
World cup final Prediction: वर्ल्डकप २०२३ चा अंतिम सामना 'या' दोन संघांमध्येच होणार; मिसबाह-उल-हकचे भाकीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com