Shubman Gill: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिलला ICC कडून मोठं गिफ्ट

ICC Player Of The Month Award: आयसीसीने सप्टेंबर महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहिर केला आहे.
Shubman Gill
Shubman Gillsaam Tv
Published On

ICC Player Of The Month Award News In Marathi:

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत.

या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. भारतीय संघाचा तिसरा सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा..

काही दिवसांपुर्वी आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नावं जाहीर केली होती. ज्यात शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि डेव्हिड मलानला नामांकनं मिळाली होती.

नुकतीच आयसीसीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. शुभमन गिलची सप्टेंबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.

Shubman Gill
IND vs PAK: डर का माहौल..! विराट अन् रोहितला रोखण्यासाठी PAK च्या गोलंदाजांनी केलाय हा खास प्लान

सप्टेंबर महिन्यात केलीये दमदार कामगिरी...

शुभमन गिलने सप्टेंबर महिन्यात दमदार कामगिरी केली आहे. या दरम्यान त्याने ८० च्या सरासरीने ४८० धावा केल्या आहेत. आशिया चषकात त्याने ७५.५ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या होत्या.

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या २ वनडे सामन्यांमध्ये त्याने १७८ धावा चोपल्या होत्या. याच दमदार खेळीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. (Latest sports updates)

Shubman Gill
Ind Vs Pak : रोहित शर्माचा पाकिस्तानविरुद्ध मोठा प्लान?; सगळ्यांनाच देऊ शकतो आश्चर्याचा धक्का

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळणार का?

शुभमन गिलच्या एकुण कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३५ वनडे सामन्यांमध्ये ६६.१ च्या सरासरीने आणि १०२.८४ च्या स्ट्राईक रेटने १९१७ धावा केल्या आहेत. आयसीसीच्या रँकिंगमध्येही शुभमन गिलचा दबदबा पाहायला मिळाला आहे.

या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानी आहे. लवकरच शुभमन गिल त्याला मागे सोडू शकतो.

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता.

त्यानंतर अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यातही तो खेळताना दिसून आला नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे फिट असून लवकरच वर्ल्डकपचे सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com