Shardul Thakur News: टीम इंडिया सोडा, शार्दुलला कर्नाटकच्या संघातही स्थान मिळायचं नाही; माजी खेळाडू कडाडला

Dodda Ganesh On Shardul Thakur: माजी भारतीय खेळाडूने शार्दुल ठाकुरबाबत मोठं वक्तक्य केलं आहे.
shardul thakur
shardul thakur twitter
Published On

Dodda Ganesh On Shardul Thakur:

भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सुरूवातीच्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. गुणतालिकेत ८ गुणांसह भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.

आता पाचव्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाही.

दरम्यान या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू डोडा गणेश यांनी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुरवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे.

डोडा गणेश यांनी X वर ट्व़ीट करत लिहिले की,' शार्दुल ठाकुरचा पूर्ण आदर करून मी हे म्हणू शकतो की, तो आपल्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघ सोडा कर्नाटकच्या प्लेइंग ११ मध्येही स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करेल.' शार्दुल ठाकुरला भारतीय संघात सातत्याने संधी दिली जातेय कारण, शार्दुल ठाकुर गोलंदाजीसह फलंदाजीतही योगादान देऊ शकतो. मात्र गेल्या ३ सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. (Latest sports updates)

shardul thakur
Viral Cricket Video: बंगळुरूत Live सामन्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, पुढे जे घडलं..पाहा Video

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकुरला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कारण चेन्नईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात आर अश्विनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यात शार्दुल ठाकुरला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. या ३ सामन्यांमध्ये त्याला केवळ २ गडी बाद करता आले आहेत.

अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६ षटक गोलंदाजी करून ३१ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या त्याला २ षटकं टाकण्याची संधी मिळाली यादरम्यान त्याने १२ धावा खर्च करत एकही गडी बाद केला नव्हता.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातही त्याला आपली छाप सोडता आली नाही. ९ षटकात त्याने ५९ धावा खर्च केल्या. या सामन्यातही त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

शार्दुल ठाकुर फॉर्ममध्ये नसला तरीदेखील न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं निश्चित आहे. कारण बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला आहे. तर हार्दिक पंड्याची रिप्लेसमेंट म्हणून आर अश्विन किंवा मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते.

shardul thakur
Viral Video: ऑस्ट्रेलियन फॅनवर चढला इंडियन फिव्हर! पाकविरूद्धच्या सामन्यात दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा; Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com